दारणा, गंगापूर धरणात निम्मा पाणीसाठा
सार्वमत

दारणा, गंगापूर धरणात निम्मा पाणीसाठा

Arvind Arkhade

अस्तगाव|वार्ताहर|Asatgav

तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दारणा धरण 53.01 टक्के, भावली 58.18 तर गंगापूर धरण 50 टक्के भरले आहे.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचे मध्यम स्वरुपाचे आगमन होत आहे. दारणा धरणात काल शुक्रवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत 172 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले आहे. या धरणातील साठा 53 टक्के इतका झाला आहे. भावलीत 47 दशलक्ष घनफूट नव्याने पाणी दाखल झाले. भावली 58.18 टक्क्यांवर पोहचले आहे. 24 तासांत गंगापुरात 25 दशलक्ष घनफूट पाणी वाहून आले. गंगापूर धरण 50 टक्के भरले आहे. कश्यपी 22.48 टक्के, गौतमी 19.16 टक्के भरले आहे. वालदेवी 24.62, कडवा 10.42, गौतमी गोदावरी 19.16, असा साठा झाला आहे

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी येथे 59, घोटी 24, तर दारणाच्या भिंतीजवळ 4 मिमी पावसाची नोंद झाली. तर भावलीला 48 मिमी पावसाची नोंद झाली. तर गंगापूरच्या पाणलोटात 24 तासांत 5 मिमी, त्र्यंबकला 9, कश्यपी 4, अंबोली 39 मिमी, वालदेवी 7, गौतमी गोदावरी 6 मिमी पावसाची नोंद झाली.

नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 807 क्युसेकने विसर्ग गेल्या 3 दिवसांपासून सलग सुरू आहे. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com