कोणत्याही क्षणी दारणा ओव्हरफ्लो होणार

कोणत्याही क्षणी दारणा ओव्हरफ्लो होणार

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सह्यद्रीच्या घाटमाथ्यावर काल दिवसभर मुसळधार पाऊस (Rain) सुरू होता. दारणा (Darna), गंगापूरच्या पाणलोटात (Watershed of Gangapur) आषाढ सरींचे तांडव काल दिवसभर सुरु होते. गंगापूर धरणाच्या (Ganagapur Dam) परिसरात काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 या 12 तासांत 138 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे 12 तासांत या धरणात 228 दलघफू नवीन पाणी दाखल झाले.

या धरणाचा साठा (Dam Storage) काल सायंकाळी 6 वाजता 41.24 टक्के इतका झाला होता. दुसरीकडे दारणाच्या पाणलोटातही (watershed of Darna) इगतपुरी (Igatpuri), घोटीला (Ghoti) दिवसभर मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसल्याने या धरणात काल सकाळी 60.51 टक्क्यांवर असलेला साठा आज सकाळी 6 पर्यंत 65 टक्क्यांहुन अधिक तयार होऊ शकतो. 68 टक्क्यांच्या पुढे सरकल्यानंतर या धरणातून विसर्ग सोडावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळनंतर याबाबतचा निर्णय कोणत्याहीक्षणी होण्याची शक्यता आहे.

भावलीही (Bhavli) 80 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. काल सकाळी भावली (Bhavali) 73.85 टक्क्यांवर पोहचले होते.

गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाचा मागमूस नसलेल्या गंगापूर च्या पाणलोटात गेल्या 3-4 दिवसांपासून पावसाने मनावर घेतले आहे. काल दिवसभर गंगापूर चे पाणलोट क्षेत्र पावसाने झोडपून काढले. गंगापूर काल सकाळी 37.71 टक्के इतके होते. मुसळधार पावसाने गंगापूर मध्ये नंतरच्या 12 तासात 4 टक्के पाणी साठ्यात वाढहोऊन हे धरण 41.24 टक्क्यांवर पोहचले. गंगापुरच्या भिंतीजवळ 12 तासांत 138 मिमी इतकी नोंद झाली. पाणलोटातील अंबोलीला 146 मिमी, त्र्यंबकला 114 मिमी पावसाची नोंद झाली. 228 दलघफू नवीन पाणी 12 तासांत दाखल झाले. कश्यपी च्या भिंतीजवळ 92 मिमी इतका पाऊस झाला. 85 दलघफू नवीन पाणी या धरणात दाखल झाले. हे धरण काल सायंकाळी 6 वाजता 24.62 टक्के इतके भरले होते. गौतमीच्या पाणलोटात काल सायंकाळी 6 पर्यंत 12 तासांत 91 मिमी इतका पाऊस झाला. या धरणात 12 तासांत 143 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 24.64 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.

दारणाच्या पाणलोटातही काल दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. इगतपुरी, घोटी परिसरात पावसाचा जोर कायम होता. दारणा चासाठा काल सकाळी 6 वाजता 60.51 टक्के इतका होता. तो आज गुरुवारी 65 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो. रात्री उशीरापर्यंत हा साठा 68 टक्के होऊ शकतो. त्यानंतर या धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कालचा दिवसभराच्या पावसाने रात्रीतून या धरणात चांगली आवक होऊ शकते. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 35 मिमी, घोटी येथे 72 मिमी, इगतपुरीला 95 मिमी पावसाची नोंद झाली. रात्रीतून दारणात 424 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. दारणाचा साठा वाढत आहे. दोन दिवसात दारणातून विसर्ग सुरु होण्याची चिन्हे आहेत.

दारणा लगतच्या भावली परिसरातही पावसाची संततधार सुरु होती. भावली काल सकाळी 73.85 टक्क्यांवर होते. या धारणाच्या पाणलोटात मागील 24 तासांत 119 मिमी पावसाची नोदं झाली.1434 दलघफू क्षमतेच्या या धरणात 1059 दलघफू इतका साठा होता. त्यात आज गुरुवारी सकाळी चांगली वाढ होऊ शकणार आहे. भावली 80 टक्क्यांवर पोहचु शकेल असा अंदाज आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच त्याच्या सांडव्यावरुन पाणी ओव्हरफ्लो होऊ शकेल. ओव्हरफ्लो नंतर हे पाणी दारणात दाखल होते.

अन्य धरणांचे साठे असे- मुकणे 25.32 टक्के, वाकी 5.55 टक्के, भाम 23.27 टक्के, वालदेवी 66.28 टक्के, कडवा 13.74 टक्के, आळंदी 6.75 टक्के, पालखेड 29.53 टक्के असा साठा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com