दारणा,भावलीला पावसाची रिपरिप सुरुच
सार्वमत

दारणा,भावलीला पावसाची रिपरिप सुरुच

गोदावरीत 2421 क्युसेकने विसर्ग

Arvind Arkhade

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल दिवसभरात सह्यद्रिच्या घाटमाथ्यावर दारणा, भावलीच्या पाणलोटात पावसाच्या कधी मुसळधार तर कधी हलक्या सरी बरसत होत्या. गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल पावसाचे आगमन नगण्य होते. मात्र काल सकाळी संपलेल्या 24 तासांत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

भावलीला 24 तासांत 118 मिमी पावसाची नोंद झाली. तर दारणाच्या पाणलोटातील इगतपुरीला 108 मिमी पावसाची नोंद झाली. या तुलनेत गंगापूरच्या पाणलोटात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

दारणा धरण काल सकाळी 85.09 टक्क्यांवर तर गंगापूर धरण 53.81 टक्क्यांवर पोहचले होते. दारणात 24 तासांत 362 दलघफू नविन पाणी दाखल झाले. भावलीत 76 दलघफू पाणी नविन दाखल झाले. भावलीतून 948 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

भावली ओव्हरफ्लो असल्याने हे पाणी दारणाच्या दिशेने वाहत आहे. काल सकाळी दारणाच्या भिंतीजवळ 15, घोटीला 47, तर इगतपूरीला 108 मिमी पावसाची नोंद झाली. 7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 6083 दलघफू पाणी साठा आहे. या धरणात 1250 क्युसेक ने विसर्ग दोन दिवसांपासुन सुरु झाला आहे. काल दारणा तसेच भावलीच्या पाणलोटात पावसाच्या अधुनमधुन कधी दमदार तर कधी हालक्या सरी बरसत होत्या.

गंगापूर धरणाची परिस्थिती काहीशी वेगळी आहे. 5630 क्षमतेच्या या धरणात 3030 दलघफू पाणीसाठा आहे. हे धरण 53.81 टक्के भरले आहेत. काल सकाळी संपलेल्या 24 तासात गंगापूरला 45, त्र्यंबकला 70, तर आंबोलीला 31 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूरला 65 दलघफू नविन पाणी दाखल झाले. काल दिवसभरातील 12 तासात पावसाचे किरकोळ बुरबूर होती.

गंगापूरला 3 मिमी, अंबोलीला 6 मिमी, त्र्यंबकला 2 मिमी पावसाची नोंद झाली. तर काल सकाळी संपलेल्या 24 तासात कश्यपीला 17 मिमी पाउस झाला. या धरणात 11 दलघफू नविन पाणी दाखल झाले. गौतमीला 33 मिमी पाउस झाला, या धरणात 42 दलघफू नविन पाणी दाखल झाले. काल दिवसभरातील 12 तासात गौतमीला व कश्यपीला 2-2 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपी 26.13 टक्के भरले तर गौतमी 24.43 टक्के भरले आहे.

दारणातील विसर्ग आणि नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या पाणलोटातील पावसामुळे काल सायंकाळी 5 वाजता गोदावरीत सुरु असलेला 1614 क्युसेकचा विसर्ग तासाभरात वाढवून 2421 क्युसेक इतका करण्यात आला आहे. त्यामुळे गोदापात्रातील पावसाची खळखळ सुरु आहे.

जायकवाडी 55.32 टक्के !

जायकवाडी धरणाचा काल सायंकाळी सहा वाजताचा साठा 55.32 टक्के इतका होता. या जलाशयात आजुबाजुच्या परिसरातुन 2936 क्युसेक ने पाणी दाखल होत होते. या धरणातील उपयुक्त साठा 42.2 टिएमसी तर मृतसह एकूण साठा 68.5 टिएमसी इतका आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com