दरेवाडीतील दोन गटामधील वाद ; 11 आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी

दरेवाडीतील दोन गटामधील वाद ; 11 आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर|Ahmedagar

नगर तालुक्यातील दरेवाडीत दोन गटाच्या (Darewadi) राजकीय पदाधिकार्‍यांमध्ये (Political Office Bearers) सोमवारी सकाळी राडा (Fight) झाला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 12 आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर (Court) हजर करण्यात आले होते. त्यातील 11 आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Cell) सुनावली आहे. तर एका राजकीय पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षांची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी दरेवाडीत दोन गटामध्ये वाद झाला. हा वाद भिंगार पोलीस ठाण्यात (Bhingar Police Station) पोहचल्यानंतर तेथेही दोन गट भिडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या महिलांनी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 20 जणांविरूद्ध विनयभंग व मारहाणीच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. तर तिसरी फिर्याद पोलिसांनी दिली आहे. यामध्ये 22 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com