दारणा, गंगापूरच्या पाणलोटातही पावसाच्या हलक्या सरींचे आगमन

दारणा, गंगापूरच्या पाणलोटातही पावसाच्या हलक्या सरींचे आगमन

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता, कोपरगाव तालुक्याच्या शेतीचे भवितव्य अवलंबून असलेल्या दारणा, गंगापूर धरणांच्या पाणलोटात काल सकाळी संपलेल्या 24 तासात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.

दारणाच्या भिंतीजवळ 9 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूरला 25 मिमी, वाकी 13 मिमी, भाम 6 मिमी, भावली 14 मिमी, वालदेवी 3 मिमी तर कश्यपीला 1 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी येथे काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात 15 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूरच्या पाणलोटातील त्र्यंबकला 4 मिमी पावसाची नोंद झाली. यावर्षी प्रथमच पावसाचे घाटमाथ्यावर हालक्या सरींच्या रुपाने आगमन झाले. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाची नोंद नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी राहाता येथे 12 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अन्यत्र कुठेही पावसाची नोंद नाही.

काल सकाळी 6 च्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये 20.92 टक्के उपयुक्त साठा आहे. गेल्या वर्षी कालच्या तारखेला तो 20.25 टक्के इतका होता.

काल शुक्रवारी सकाळी 6 पर्यंतचे नाशिक जिल्ह्यातील धरणांचे साठे असे

धरणाचे आजचा साठा टक्केवारी

नाव (टिएमसी)

दारणा 1.3 19.18

गंगापूर 1.6 29.38

मुकणे 2.6 36.55

भावली 0.06 4.39

वालदेवी 0.11 10.33

कश्यपी 0.37 20.30

गौतमी गो. 0.57 31.00

कडवा 0.27 1.17

आळंदी 0.027 3.31

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com