दारणा धरण निम्मे भरले भावलीत 63 टक्के पाणीसाठा

दारणा धरण निम्मे भरले भावलीत 63 टक्के पाणीसाठा
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

सह्याद्रीच्या (Sahyadri) घाटमाथ्यावर काल दिवसभर पावसाने मुसळधार (Heavy Rain) रुप धारण केले होते. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत दारणाच्या पाणलोटातील (watershed of Darna) इगतपूरी (Igatpuri) येथे 222 मिमी पाऊस झाला. भावलीच्या (Bhavali) भिंतीजवळ 246 मिमी पाऊस झाला. त्यामुळे या धरणांच्या जलसाठ्यात वाढ (Increase in water storage of dams) होत आहे. काल सकाळी या धरणाचा साठा 48.62 टक्क्यांवर पोहचला आहे. आज सकाळी हे धरण 50 टक्क्यांहुन अधिक झालेले असेल. तर भावलीचा साठा (Bhavali Storage) सकाळी 62.64 टक्क्यांवर पोहचला होता.

परवा रविवारी दुपार नंतर सह्याद्रीच्या घाटमाथा पावसाने अक्षरश: झोडपून काढला. दारणात 24 तासांत 162 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. तर भावलीत 160 दलघफू नविन पाणी दाखल झाले. दारणाच्या भिंतीजवळ 10 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र या धरणाच्या पाणलोटातील इगतपुरीला सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत तब्बल 222 मिमी पावसाची नोंद झाली. घोटीला 55 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे डोंगरदर्‍यांमधून पाणी धरणाच्या दिशेने धावु लागले आहे. 7149 दशलक्ष

घनफूट क्षमतेच्या या धरणात 3476 दलघफू पाणीसाठा झाला आहे. हे धरण 48.62 टक्के पाणीसाठा झाला आहे.

भावली धरणाच्या (​​Bhavli dam) पाणलोटात धुव्वाधार पाऊस झाला. काल सकाळी संपलेल्या 24 तासात 246 मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे भावलीचा साठा 62.64 टक्क्यांवर काल सकाळी 6 वाजता पोहचला होता. काल सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे या धरणात 65 टक्क्यांहुन अधिक पाणीसाठा तयार झाला असेल. 1434 क्षमतेच्या या धरणात 898 दलघफू पाणीसाठा तयार झाला होता.

गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोटात पहिल्यांदाच दमदार पाऊस झाला. या धरणाच्या भिंतीजवळ 55 मिमी पावसाची नोंद झाली. पाणलोटातील अंबोली येथे156 मिमी, त्र्यंबकला 71 मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक ला 23 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी 6 वाजे पर्यंत गंगापूर मध्ये अवघे 11 दलघफू नविन पाणी दाखल झाले होते. पाऊस पडता झाल्याने परवा सकाळी गंगापूरचा साठा 32.78 टक्क्यांवरुन काल सकाळी 32.98 टक्यांवर सरकला आहे. पहिल्यांदाच नविन पाणी दाखल झाले आहे. 5630 क्षमतेच्या या धरणात 1857 दलघफू पाणीसाठा आहे. गंगापूर धरण (Gangapur Dam)समुहातील कश्यपी ला 22 मिमी, गौतमी गोदावरी 79 मिमी असा पाऊस नोंदला गेला. गौतमी गोदावरीत 14.86 टक्के पाणी साठा आहे. काल सकाळ पर्यंतच्या पावसाने या धरणात 54 दलघफू नविन पाणी दाखल झाले. कश्यपी 16.84 टक्के पाणीसाठा होता.

अन्य धरणांचा पाऊस असा- मुकणे 33 मिमी, वाकी 74 मिमी, भाम 73 मिमी, वालदेवी 5 मिमी, कडवा 10 मिमी, आळंदी 55 मिमी, असा पाऊस नोंदला गेला. तर टक्केवारी अशी- कडवा 13.50 टक्के, आळंदी 5.65 टक्के, भाम 15.17 टक्के, वाकी 1.69 टक्के, भोजापूर 13.30 टक्के, पालखेड 29.43 टक्के असा पाणी साठा आहे.

काल दिवसभर नाशिक जिल्ह्यात धरणक्षेत्रात दमदार पाऊस होत होता. तर घाटमाथा झोडपून काढला आहे. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातही दुपारी काही ठिकाणी अर्धातास दमदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी बुरबूर होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com