घाटमाथ्यावरील रिपरिप थांबली; दारणा 93 टक्के, गंगापूर 88 टक्क्यांवर

घाटमाथ्यावरील रिपरिप थांबली; दारणा 93 टक्के, गंगापूर 88 टक्क्यांवर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सह्याद्रीचा घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. अन्य भागातही कडक ऊन पडल्याने धरणात नविन पाणी दाखल होण्याचा वेग मंदावला आहे. घाटमाथ्यावरील झरे मात्र कमी वेगाने का होईना कोसळत आहेत. दरम्यान दारणा 93 टक्क्यांवर पोहचले आहे. गंगापूरही 88 टक्क्यांवर पोहचले आहे.भाम, भावली, वालदेवी ही तीनही धरणे 100 टक्के भरली आहेत.

दोन तीन दिवसांपासून घाटमाथ्यावरील पावसाने विश्रांती घेतली आहे. दोन दिवस कडक ऊन पडले होते. तर काल दुपारनंतर ढगाळ वातावरण असल्याचे चित्र होते. मात्र पाण्याचा थेंबही बरसला नाही. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 6646 दलघफू पाणीसाठा आहे. 7.1 टिएमसीच्या धरणात 6.6 टिएमसी पाणीसाठा आहे. हे धरण 92.96 टक्के भरले आहे. यातुन 1250 क्युसेकने विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने सुरू आहे. काल सकाळी 6 पर्यंत या धरणातून आतापर्यंत 3.4 टिएमसी पाण्याचा विसर्ग नांदूरमधमेश्वरच्या बंधार्‍याच्या दिशेने झाला आहे.

काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत या धरणात 109 दलघफू नविन पाण्याची आवक झाली. कालपर्यंत 1 जून पासून 8 टिएमसी पाण्याची आवक या धरणात झाली. 6.6 टिएमसी साठा राखून अन्य पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. भावलीतून 135 क्युसेक विसर्ग दारणाच्या दिशेने सुरू आहे. भावली तुडूंंब भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. आता पर्यंत या प्रकल्पातून 315 दलघफू पाण्याचा विसर्ग झाला आहे. मुकणे 75.36 टक्के भरले आहे.भाम तुडूंब भरले. भामच्या सांडव्यावरून 1119 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वाकी धरण 53.77 टक्के भरले आहे.वालदेवीही 100 टक्के भरले. यातून 65 क्युसेकने सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे.

गंगापूर धरण समुहातील एकाही धरणातून विसर्ग सुरू नाही. गंगापूर धरण 87.51 टक्के भरले आहे. 5630 दलघफू क्षमतेच्या या धरणात 4927 दलघफू पाणी साठा आहे. काल या धरणात सकाळी मागील 24 तासांत 32 दलघफू नविन पाणी दाखल झाले. 1 जूनपासून या धरणात 2.7 टिएमसी पाणी नव्याने दाखल झाले. गौतमी गोदावरीत 54.50 टक्के पाणीसाठा झाला आहे. कश्यपीत 52.05 टक्के पाणीसाठा आहे. कडवा 88.21 टक्के भरले आहे. आळंदी 63.85 टक्क्यांवर स्थिर आहे.

गोदावरीतून 5.4 टिएमसीचा विसर्ग दरम्यान वरील धरणांमधून पाणी दाखल झाल्याने तसेच पावसाचे पाणी असे 1 जून पासून 5.4 टिएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने गोदावरीतून वाहिले आहे. काल सकाळी गोदावरीतून जाकवाडीच्या दिशेने 1211 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com