मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनापासून दंडूका मोर्चा

नानासाहेब जावळे पाटील यांचा इशारा
मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनापासून दंडूका मोर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - मराठा आरक्षण ही जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारची आहे. मराठा आरक्षणचा राज्यशासनाने अक्षरशः गळा घोटलेला असून आता आरक्षणासाठी मराठ्यांनी कोणासोबत लढाई करावी हे राज्य सरकारने सांगावे. मराठा आरक्षण व खोट्या अट्रॉसिटी गुन्ह्यांबद्दल क्रांती दिन (दि. 9 ऑगस्ट) पासून अखिल भारतीय छावा संघटना राज्यात आक्रमक भूमिका घेवून दंडूके हातात घेवून मोर्चे काढणार असल्याची घोषणा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केली.

भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष जावळे पाटील यांच्या उपस्थितीत नगरच्या शासकीय विश्रामगृह येथे मराठा आरक्षण पुढील दिशा व अखिल भारतीय छावा संघटना अहमदनगर जिल्हा आढावा बैठक पार पडली.

यावेळी जावळे पाटील म्हणाले, मराठा समाज मोठ्या संख्येने महाराष्ट्रात राहतो म्हणून या समाजाला आरक्षण देण्याची जबादारी राज्यवर आहे. नगर जिल्ह्यात कोपर्डी सारखी घटना घडून 5 वर्ष पूर्ण होवून देखील आरोपींना अद्यापपर्यंत शिक्षा झालेली नाही. गोरगरीब जनतेचा अजूनही न्याय व्यवस्थेवर विश्‍वास आहे. ज्या दिवशी सर्वसामान्य जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्‍वास उडेल त्या दिवशी जनता कायदा हातात घेवून नराधमांना धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. मराठा आरक्षणा बद्दल राष्ट्रवादी पक्षाची भूमीका नेहमीच दुट्टपी वाटत आहे. तसेच शेतकर्‍यांचा 7/12 कोरा करण्याचे आमिष या सत्ताधार्‍यांनी जनतेला दाखवून जनतेची दिशाभूल केली आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे (नांदेड), विद्यार्थी आघाडीचें प्रदेश अध्यक्ष विजयभैय्या घाडगे (लातूर), केंदीय सहकार्याध्यक्ष भिमराव मराठे (जालना) यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीस विद्यार्थी आघाडीचे विजयकुमार घाडगे पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, देवेंद्र लांबे, दादा बडाख, विजय बडाख, रमेश पाटील म्हसे, शरद बोंबले, दौलत गायकवाड, प्रदीप पटारे, अक्षय पटारे, गणेश धुमाळ, राजू गुंजाळ, किरण उघडे, निलेश बनकर, बहिरनाथ मामा गोरे,मनोज होंड,अक्षय बोरुडे राहुल तारक, मयूर पटारे, भाऊसाहेब मांडगे, अमोल वाळुंज, सोनू सागर, रोहित उंडे, नागेश जाधव, सुभाष मोरे, गोरक्षनाथ उंडे, किरण गुंजाळ, अनिकेत काकडे,गोरख म्हसे, सचिन खंडागळे, वीरेश बोठे, किरण फटांगरे,गणेश गायकवाड, सुरेखाताई सांगळे, परिमल दवंगे, प्रवीण देवकर, नितीन कदम, महेंद्र शेळके आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com