संगमनेरचे दंडकारण्य अभियान हे राज्याला आदर्शवत - ना. आदित्य ठाकरे

महाविकास आघाडी हा राज्यातील जनतेसाठी दुग्धशर्करा योग
संगमनेरचे दंडकारण्य अभियान हे राज्याला आदर्शवत - ना. आदित्य ठाकरे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) हे विधान मंडळातील सर्वात अनुभवी नेते आहेत. त्यांनी नव्या पिढीतील आमदारांना कायम सातत्याने मार्गदर्शन केले आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणार्‍या त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याने (Sangamner Taluka) सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे. हे मॉडेल आमच्या मतदारसंघातही आम्ही अनुकरणीय ठरणार आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) हे तीन पक्षांचे सरकार असले तरी हा राज्यातील जनतेसाठी दुग्धशर्करा योग असून हे सरकार अत्यंत चांगले काम करून समृद्ध महाराष्ट्र निर्माण करेल असा विश्वास व्यक्त करताना संगमनेरचे दंडकारण्य अभियान (Dandakaranya Campaign of Sangamner) हे संपूर्ण राज्यातील आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री नामदार आदित्य उद्धव ठाकरे (Minister for Environment and Tourism Aditya Uddhav Thackeray) यांनी काढले आहे

पिंपरणे (Pimparne) येथील कार डोंगर परिसरात जय हिंद लोकचळवळ अमृत उद्योग समूह, वन विभाग व सर्व सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दंडकारण्य अभियानाच्या (Dandakaranya Campaign of Sangamner) 16 व्या आनंद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) हे होते. तर व्यासपीठावर सहकार व कृषी राज्यमंत्री नामदार डॉ. विश्वजित कदम (Minister of State for Co-operation and Agriculture Dr. Viswajit Kadam), खासदार सदाशिव लोखंडे (MP Sadashiv Lokhande), आ. डॉ सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe), बाजीराव पा.खेमनर , महानंदाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, अ‍ॅड. माधवराव कानवडे, प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीतभाऊ थोरात, मनीष मालपाणी , लक्ष्मणराव कुटे, सुनंदाताई जोर्वेकर, मीराताई शेटे, शरयुताई देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात ,मुख्य वनसंरक्षक नितिन गुदगे आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी बोलताना नामदार आदित्य ठाकरे (Minister for Environment and Tourism Aditya Uddhav Thackeray) म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अत्यंत दूरदृष्टीतून संगमनेरमध्ये सहकार उभा केला आहे. या सहकारामुळे ग्रामीण विकास साधला असून खर्‍या अर्थाने ग्रामीण भागात मोकळा श्वास आहे. ग्रामीण भागातून अनेक गोष्टी शिकायला मिळत असून महा विकास आघाडी सरकारमध्ये शहरी-ग्रामीण असे एकत्र विचार आले असून हा दुग्धशर्करा योग आहे. तीन पक्षांचे सरकार असले तरी समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी नामदार उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार काम करत आहे. महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे विधान मंडळातील येष्ठ सदस्य असून अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करताना त्यांनी कायम सातत्याने मला प्रोत्साहन दिले आहे.

पर्यावरण व पर्यटन खात्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात असून कोरोना सारख्या महामारी वर मात करण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन अत्यंत गरजेचे आहे. वृक्ष हे समृद्ध व संपन्न आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून 20 वर्षानंतर पिढी बदलते मात्र प्रत्येकाने वृक्षसंवर्धन क पर्यावरणाचे संवर्धन केलेच पाहिजे असे सांगताना संगमनेरची दंडकारण्य अभियान ही खरी लोकचळवळ ठरली असून देशाला आदर्शवत ठरली असल्याचेही ते म्हणाले.

तर महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण, पर्यटन खात्याला एक नवी झळाळी दिली आहे. आज मुंबईसारख्या महानगरांमध्ये महापालिका सह इतर ऐतिहासिक वास्तू त्यांनी पर्यटनासाठी खुली केली आहे. महाविकास आघाडी सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगले काम करत असून कोरोनाच्या संकटात देशाला दिशादर्शक काम करताना सर्व सामान्यांची काळजी त्यांनी घेतली आहे. शेतकर्‍यांना सातत्याने पाठीशी महाविकास आघाडी सरकार आहे. याउलट केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना चिरडत आहे. हा फरक प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. अस्मानी संकटे, कोरोना महामारी असूनही महाविकास आघाडी सरकारने विकासाचा वेग कायम राखला आहे. विरोधी पक्षातील अनेक देव पाण्यात घालून बसले आहेत काहींना रात्री ही सरकार पाडण्याची स्वप्न पडत आहे. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे अत्यंत चांगले काम करणार असल्याचेही ते म्हणाले.

तर रायमंत्री डॉ. कदम म्हणाले की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अत्यंत दृष्टीतून सहकारी संस्थांचा पाया घातला. शिक्षण, कृषी व सहकार हा त्रिवेणी संगम या भागांमध्ये आढळतो आहे. आणि यामुळे ग्रामीण विकास समृद्ध झाला आहे. राजहंस दूध संघाने महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन विक्री करत महाराष्ट्राचा खर्‍या अर्थाने गौरव वाढविला आहे. पारदर्शकता व कडक शिस्त ही सहकारातील अत्यंत महत्त्वाची बाब असून चांगले नेतृत्व असले तर दुष्काळी तालुक्यात मोठे परिवर्तन घडते याचे मोठे उदाहरण म्हणजे संगमनेर तालुका होय.

खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे अत्यंत चांगले काम करत असून नामदार बाळासाहेब थोरात हे प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे. सर्वांना बरोबर घेऊन जात त्यांनी या विभागाचा विकास साधला आहे. आता पुढील अनेक वर्ष महाविकास आघाडी सरकार रायात काम करील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शंकरराव पा.खेमनर, सौ.मिराताई शेटे, सौ.सुनंदाताई जोर्वेकर, डॉ.हर्षल तांबे, मनिष मालपाणी, अमित पंडीत, रामहरी कातोरे, सुहास आहेर, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, दंडकारण्य अभियानाचे समन्वयक बाळासाहेब उंबरकर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगळुरे, वन विभागाचे संदीप पाटील, दशरथ वर्पे,सुधाकर रोहम आदी उपस्थित होते

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी आभार मानले.

हर्मन हीलचे लोकार्पण

ग्रामीण भागात पाणलोट विकासातून मोठे काम करणारे फादर हर्मन बाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोळवाडे, पिंपरणे परिसरातील कार डोंगर येथे 50 एकर वर 157 विविध प्रजातींच्या ४० हजार औषधी वनस्पतींचे रोपण केले असून याची जबाबदारी एस एम बीटी सेवाभावी संस्थेने स्वीकारली आहे. आज या टेकडीला फादर हार्मन हिल म्हणून नामकरण झाले असून त्याचे लोकार्पण मंत्रीमहोदयांच्या हस्ते झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com