अजबच! नगर जिल्ह्यातील असे एक गाव जिथे केली जाते दैत्याची पूजा.., गावात मारूतीचं मंदिर नाही

मुलाचंही नाव कोणी मारूती, हनुमान ठेवीत नाही
अजबच! नगर जिल्ह्यातील असे एक गाव जिथे केली जाते दैत्याची पूजा.., गावात मारूतीचं मंदिर नाही

खरवंडी कासार | वार्ताहर

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील दैत्य नांदूर (Daity Nandur) या गावात दैत्याची यात्रा भरते. प्रसिद्ध अश्या भगवान गडाच्या (Bhagwan Gad) पायथ्याला असणारे हे गाव. तशीच या गावची ओळख म्हणजे या गावाने राज्यात प्रत्येक जिल्ह्याला शिक्षक पुरवलेले आहेत. या गावातून अनेक तरूण भारत मातेच्या रक्षणासाठी सिमेवर तैनात आहेत. तसेच या गावातील तरूण डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पोलीस, तहसीलदार, कॅप्टन अश्या विविध सरकारी पदावर कार्यरत आहेत.

याच बरोबर या गावातील दैवत म्हणून येथे दैत्याची रोज नित्यनियमाने पुजा-आरती केली जाते. तसेच दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सर्व समाजात प्रत्येक पुरुषांना लग्नावेळी मारूती मंदीरात जाऊन बाल ब्रम्हचारी बंजरंगास जावे लागते. मात्र या गावातील लोक मारूतीस जात नाहीत तसेच मारूती नाव असलेले काहीच वापरत हि नाहीत. येथील लोक मारूती कंपनीची गाडी देखील कोणी खरेदी करत नाहीत इतकेच तर काय येथे नौकरी निमित्ताने मारूती नावाचा शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक देखील या गावात चालत नाही. या गावातील लोक आपले दैवत म्हणुण फक्त दैत्य महारांजानाच मानतात.

निंबादैत्य नांदूर या गावाची आख्यायिका रामायण काळाशी जोडली गेली आहे. यात असे म्हटले आहे की, प्रभू श्रीराम सीता मातेला रावणाच्या तावडीतून सोडवून आणतात मात्र ते सीता मातेला पुन्हा जंगलात सोडून देतात. सीता मातेला दंडकारण्यात सोडून देण्याची जबाबदारी हनुमानकडे दिलेली असते. या ठिकाणाला काशी केदारेश्वर असे संबोधले जाते. तिथल्या जंगलात सीतामातेला सोडल्यावर हनुमान फळे आणण्यासाठी दूरवर जातो. एका ठिकाणी त्याला पुष्कळ फळे दिसतात ती तोडण्यासाठी हनुमान तिथे जातो.

आपल्या राज्यात येऊन कोण फळे तोडतो याचा राग निंबादैत्यला येतो. हनुमानाला समोर पाहून निंबादैत्य युद्ध पुकारतो. या युद्धात हनुमान आणि निंबादैत्य दोघेही जखमी होतात. निंबादैत्य श्रीरामाचा धावा करतो हे पाहून हनुमान आश्चर्यचकित होतो. श्रीराम तिथे येताच निंबादैत्यला वर देतात की या गावात तुझेच अस्तित्व राहील… तुझीच पूजा केली जाईल. त्यावर निंबादैत्य म्हणतात की तुम्ही तर प्रत्येक गावात हनुमानाचे मंदिर असेल असा वर दिला आहे मग?…यावर श्रीराम म्हणतात की, हे गाव तुझेच आहे या गावात हनुमानाचे मंदिर नसेल… एवढेच नाही तर या नावाचा कोणी उच्चारही करणार नाही.

या देवस्थानास क दर्जा तिर्थक्षेत्र विकास योजनेत सामाविष्ट झाला असून या ठिकाणी दर शनिवारी संपूर्ण गाव संध्याकाळी आरतीस हजर राहते. तसेच येथील ट्रस्टच्या माध्यमातून शाळासाठी मदत केली जाते. गावातील गरीब कुटुंबाना दिवाळी, पाडवा या सणानिमित्त मोठी मदत केली जाते. स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांनी हे गाव दत्तक घेतले होते. राज्यासह परराज्यात नोकरी निमित्ताने गेलेले गावातील कुटुंब चैत्र महिन्यात पाडव्याला यात्रेत येतात.

Related Stories

No stories found.