दाढ खुर्द ग्रामस्थांनी अवैध वाळू तस्करीचे वाहन पकडले

कामगार तलाठ्याकडून आश्वी पोलीस ठाण्यात दोघाविरुध्द गुन्हा दाखल
दाढ खुर्द ग्रामस्थांनी अवैध वाळू तस्करीचे वाहन पकडले

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर (Sangmner) तालुक्यातील दाढ खुर्द (Dadh Khurd) येथे शुक्रवारी रात्री अवैध वाळू तस्कंरी करणारे वाहन (Illegal sand smuggling vehicles) सरपंच सतिष जोशी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पकडून तलाठी व पोलीसाच्या ताब्यात दिले असून आश्वी पोलीस ठाण्यात (Ashwi Police Station) दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दाढ खुर्दच्या (Dadh Khurd) कामगार तलाठी मंगल सांगळे यानी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी दाढ खुर्दचे सरपंच सतीष जोशी यांनी फोनकरुन ग्रामस्थांच्या मदतीने अवैध वाळू तस्कंरीचे वाहन पकडल्याची (Illegal sand smuggling vehicles) माहिती दिली. त्यामुळे मी घटनास्थळी गेले असता त्याठिकाणी सरपंच सतीष जोशी, ग्रामपंचायत सदंस्य रावसाहेब जमधडे, नानासाहेब वाघमारे, भागवत जोशी, राजेद्रं जमधडे, संदीप जोरी तसेच पोलीस हवालदार रणधीर व झोडंगे उपस्थित होते. यावेळी सरपंच सतीष जोशी यानी माहिती दिली की, शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागील रस्त्यावरुन विना नबंरची झेनाँन गाडी प्रवरा नदीकडून येताना दिसली.

त्यामुळे आम्हाला संशय आल्याने आम्ही ती गाडी थांबवून पाहणी केली असता त्या गाडीमध्ये वाळू (Sand) भरलेली होती. त्यामुळे वाहनातील व्यक्तीकडे अधिक चौकशी (Inquiry) केली असता त्यानी सौरव संजय मकवाने (रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता) व अविनाश गणपत पवार (रा. चंद्रपूर, ता. राहाता) अशी नावे सांगितली. तर त्याच्याकडे अधिक चौकशी करत असताना अंधाराचा फायदा घेऊन ते दोघे पळून गेले. अशी माहिती सरपंच व ग्रामस्थानी दिली. त्यामुळे मी वाळू वाहनाची पहाणी करुन जागीच १ ब्रास वाळू ४ हजार रुपये व १ लाख रुपये किमंतीची सफेद झेनाँन वाहन असा १ लाख ४ हजार रुपये मुद्देमालाचा पंचनामा करत वाळूचे वाहन पोलीसाच्या मदतीने आश्वी पोलीस ठाणे येथे आणले आहे.

दरम्यान यावेळी गुरंन ११९ /२०२१ नुसार भादंवी कलम ३७९, ३४ व पर्यावरण संरक्षण कायदा कलम ३/१५, गौन खनिज कलम २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर (PI Sudhakar Madavkar) यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तात्याराव वाघमारे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

वाळू तस्कंराची सरपंच व ग्रामस्थांना दमबाजी..

अवैध वाळूचे वाहन आडवल्यामुळे वाळू तस्कराने थेट संरपच व ग्रामस्थाना दमबाजी केल्याची धकादायक घटना घडली असून यावेळी ग्रामस्थं व वाळू तस्कंरामध्ये बाचाबाची झाल्यामुळे वातावरण काही काळासाठी तणावपुर्ण झाले होते. त्यामुळे दिवसेंदिवस प्रवरानदीपात्रातून वाढत चाललेल्या वाळू तस्करीला प्रशासनाने आळा घालण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com