दादासाहेब रूपवते विद्यालयात चोरी

तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा
चोरी
चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सिध्दीबागेजवळील दादासाहेब रूपवते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय फोडून चोरट्यांनी तीन मॉनिटर व एक एलईडी टीव्ही चोरून नेला आहे. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते 25 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विद्यालयाच्या प्राचार्य सुनीता विलास गुंजाळ (वय 57 रा. मल्हार चौक, स्टेशन रोड) यांनी फिर्याद दिली आहे. दादासाहेब रूपवते विद्यालय 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता बंद करण्यात आले होते. यानंतर चोरट्यांनी विद्यालयाच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. लॅबच्या रूमचे कुलूप तोडून रूममध्ये ठेवलेले तीन मॉनिटर व एक एलईडी टीव्ही चोरट्यांनी चोरून नेला. दुसर्‍या दिवशी 25 सप्टेंबर रोजी सकाळी शिपाई मारूती साळवे (रा. बोल्हेगाव फाटा) यांच्या ही घटना लक्ष्यात आली. त्यांनी प्राचार्य गुंजाळ, उपप्राचार्य राहुल खंडीझोड यांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक भिमा कांबळे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com