‘तो’ सायकली चोरायचा; कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

55 हजारांच्या 11 सायकली हस्तगत
‘तो’ सायकली चोरायचा; कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील विविध ठिकाणावरून सायकली चोरी (Cycle Theft) करणार्‍या अट्टल चोराला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) जेरबंद केले आहे. दिनेश शेषराव व्यवहारे (वय 50 रा. दातरंगेमळा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीला (Theft) गेलेल्या 55 हजार रूपये किमतीच्या 11 सायकली कोतवाली पोलिसांनी जप्त (Kotwali Police Seized) केल्या आहे. दरम्यान, हस्तगत केलेल्या सायकली ज्या नागरिकांच्या असतील त्यांनी ओळख पटवून पोलीस ठाण्यातून घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

‘तो’ सायकली चोरायचा; कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
शेतकर्‍यांचा कांदा पिक न घेण्याचा निर्णय

टेलर काम करणार्‍या अजय काजी मोरे (वय 54 रा. बागडेमळा, बालिकाश्रम रस्ता) यांची सायकल सांगळेगल्ली येथून 12 ऑगस्ट रोजी चोरीला गेली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की शहरातील विविध ठिकाणावरून दिनेश व्यवहारे याने सायकली चोरी (Cycle Theft) केल्या असून, तो सायकल विक्री करण्याकरिता गाडगीळ पटांगणात येणार आहे.

‘तो’ सायकली चोरायचा; कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पोरं त्रस्त अन् मास्तर चाचण्यांनी ग्रस्त !

या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी गाडगीळ पटांगण परिसरात सापळा लावला होता. दिनेश व्यवहारे चोरीची सायकल विक्री करण्यासाठी आला असता त्याला कोतवाली पोलिसांनी पकडले. त्याची कसून चौकशी केली असता शहरातील विविध ठिकाणांवरून 11 सायकली चोरल्याची कबुली त्याने दिली.

निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, रियाज इनामदार, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

‘तो’ सायकली चोरायचा; कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशविरोधी घोषणाबाजी करणार्‍या मुख्य सूत्रधारास पोलीस कोठडी
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com