जिल्ह्यातील सर्व ग्रुप अ‍ॅडमिनला सायबर पोलिसांची नोटीस... काय म्हटलंय नोटिशीत?

जिल्ह्यातील सर्व ग्रुप अ‍ॅडमिनला सायबर पोलिसांची नोटीस... काय म्हटलंय नोटिशीत?

अहमदनगर (प्रतिनिधी)

आगामी रमजान ईद व अक्षय्य तृतीया सणांच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश, अफवा पसरविल्यास संदेश पाठविणारा तसेच ग्रुप अ‍ॅडमिन या दोघांवरही कारवाई होणार असून सीआरपीसी कलम 149 नुसार तशी नोटीस सायबर पोलिसांनी नगर जिल्ह्यातील सर्व ग्रुप अ‍ॅडमिन यांना काढली आहे.

याबाबत काढलेल्या नोटीसमध्ये सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी म्हटले आहे की, येत्या 22 एप्रिल रोजी रमजान ईद व अक्षय्य तृतीया हे सण साजरे होणार आहेत. हे सण शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याचे दृष्टीकोनातुन सोशल मीडिया जसे की व्हाटसअ‍ॅप, फेसबुक इंस्टाग्राम, ट्वीटर इत्यादी माध्यमातून आक्षेपार्ह मजकुर पोस्ट करणार्‍यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने लक्ष ठेवण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रुप अ‍ॅडमिनला सायबर पोलिसांची नोटीस... काय म्हटलंय नोटिशीत?
Mission No Pendency म्हणत फडणवीसांकडून कामाची आवराआवर... नव्या चर्चांना उधाण

समाजकंटकांकडून सोशल मिडियाचे माध्यमातुन चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात व त्यातुन दोन समाजात तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार असून अफवा पसरविणार्‍या विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व ग्रुप अ‍ॅडमिनला सायबर पोलिसांची नोटीस... काय म्हटलंय नोटिशीत?
खोके सरकार नक्की काय लपवतंय? 'तो' VIDEO शेअर करत नाना पटोलेंचा सवाल

रमजान ईद, अक्षय्य तृतीया सण शांततेत व सुव्यस्थेत पार पाडण्यासाठी आपण आपले ग्रुपचे अ‍ॅडमिन असल्याने व्हाटसअ‍ॅपला ‘ओन्ली अ‍ॅडमिन कॅन सेंड मेसेज’ अशी सेटिंग करून आपले ग्रुपवरून कोणत्याही प्रकारची अफवा किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा मजकुर प्रसारित होणार नाही याची आपण अ‍ॅडमिन या नात्याने खबरदारी घ्यावी.

जिल्ह्यातील सर्व ग्रुप अ‍ॅडमिनला सायबर पोलिसांची नोटीस... काय म्हटलंय नोटिशीत?
निपचीत पडलेली महिला अन् प्रचंड चेंगराचेंगरी! जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला भयावह VIDEO

खोटे संदेश ग्रुपवर पाठविल्यास जिल्ह्यात सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेत बाधा निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपणांस व संबंधित व्यक्तीस (मेसेज प्रसारित करणारा) जबाबदार धरण्यात येवुन संबधिताविरूध्द प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ग्रुप अ‍ॅडमिनला पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे..

जिल्ह्यातील सर्व ग्रुप अ‍ॅडमिनला सायबर पोलिसांची नोटीस... काय म्हटलंय नोटिशीत?
लोकसंख्येबाबत भारताची गाडी सुसाट.. चीनलाही टाकणार मागे
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com