पेटीएमवरून खात्यावर पैसे; फसवणुकीचा नवा फंडा

मेसेजद्वारे आलेली लिंक ओपन केल्यास होऊ शकते फसवणूक
पेटीएमवरून खात्यावर पैसे; फसवणुकीचा नवा फंडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

‘तुमच्या खात्यावर पेटीएमद्वारे पैसे पाठविले आहेत. ते मिळवण्यासाठी सोबतची लिंक डाऊनलोड करून घ्या आणि पैसे मिळवा’,

असे मेसेज गेल्या काही दिवसांपासून अनेकांना येत आहेत. हे मेसेज फसवणुकीचे असून, ती लिंक डाऊनलोड केल्यास खात्यावरील पैसे जाण्याचा धोका आहे.

सध्या ऑनलाईन फसणुकीसाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत. यासंदर्भात नगर सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीच्या तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. वेगवेगळी आमिष दाखविणारे लिंक ओपन करणे धोक्याचे बनले आहे. पेटीएमवरून तुमच्या खात्यावर थेट पैसेच जमा केल्याचे मेसेज येतो.

ज्यांना या मेसेजबद्दल माहिती नाही अशा व्यक्तीकडून लिंक डाऊनलोड करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ज्या नंबरवरून हे मेसेज येतात त्यावर कॉल केल्यास हे फोन लागत नाहीत. पेएटीमकडून आपल्याला पैसे आले असा समज लोकांचा होतो. पेटीएमवरून पैसे जमा झाल्यास खातेदाराच्या ज्या बँक खात्यात ही रक्कम जमा होते, त्या बँकेकडून तातडीने आपल्याला मेसेज येतो.

पेटीएमवरून कुणी पैसे पाठविले तर ते थेट खात्यावर जमा होतात. त्यासाठी कोणतेही लिंक डाऊनलोड करावी लागत नाही. आर्थिक व्यवहार किंवा सोशल मिडियाबद्दल जागरूक असलेल्या व्यक्तीला हे समजू शकते. परंतू त्याबद्दल याबाबतचे ज्ञान नसेल आणि पैसे मिळाल्याचा मेसेज आल्यावर उत्सुकतेपोटी पैसे मिळवण्यासाठी संबंधीत लिंक ओप केल्यास त्यांना आर्थिक फटका बसत आहे.

फसवणूकीचे नवनवीन फंडे वापरले जात आहे. मोबाईलवर आलेल्या कोणत्याही लिंक पैशाचा मोहापायी ओपन करू नका. खात्याला मोबाईल नंबर लिंक असल्यास पैसे कट होतात. अशा फसवणूकीतून अनेकांचे पैसे गेले आहेत. त्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. यामुळे विनाकारण लिंक ओपन करून नयेत.

- अरूण परदेशी, (पोलीस निरीक्षक, सायबर सेल)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com