ग्राहकाकडून दुकानदाराची फसवणूक

11 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
ग्राहकाकडून दुकानदाराची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कामगाराचा विश्वास संपादन करुन ग्राहकाने कापड व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी व्यावसायिक प्रदपी रामदास गाली (वय 44 वर्ष, धंदा व्यवसाय रा, पवननगर, भिस्तबाग नगर) यांनी जयेश (पूर्ण नाव माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

यात सहा हजार रुपये किमतीच्या विविध रंगाच्या तिस लेगी पिस, दोन हजार रुपयांच्या सहा कुर्ती, तीन हजार रुपये किमतीचे सहा कुर्ती पिस असे एकूण 11 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. फिर्यादी यांचे सोहम बुटीक नावाचे कपडे विक्रीचे दुकान आहे. 30 नोव्हेंबर सकाळी दहा वाजता नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दुपारी सव्वादोनच्या सुमारास मी व पत्नी दोघे जेवणासाठी घरी गेलो. तेव्हा कामगार संजना दुकानात काम करत होती. अडीचच्या सुमारास संजना हिने फोन करून सांगितले की, जयेश (पूर्ण नाव माहित नाही) नावाचे ग्राहक कपडे खरेदी करणेकरिता आले आहेत.

संजनाने ग्राहकास माझे सोबत फोनवर बोलायला दिले असता तो मला म्हणाला की, मला वेगवेगळे प्रकारचे कपडे खरेदी करायचे आहेत. तुम्ही दुकानात कधी येणार आहेत. त्यावर मी दुकानात येण्यास 4 वाजतील असे सांगितले. त्यानंतर 2 वाजून 45 मिनिटांनी संजना हिचा फोन आला व म्हणाली की, जयेश या ग्राहकाने माझ्याकडून कपडे खरेदी केले आहेत. समोर जावून माझ्या ओळखीच्यांना कपडे दाखवून पैसे घेवून येतो असे म्हणून कपडे घेवून गेला आहे. मी लगेचच दुकानात गेलो. तेव्हा दुकानाच्या आजूबाजूला पाहिले असता ग्राहक जयेश मला कुठेच दिसला नाही. त्याच्या मोबाईलवर फोन केला असता तो चुकीचा लागला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com