संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस सज्ज!

संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस सज्ज!

कायदा सुव्यवस्थेसाठी कृती आराखडा तयार

सुपा |वार्ताहर| Supa

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक दी चेन मोहीम अंतर्गत राज्य शासनाने 15 दिवसांच्या संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

त्याअनुषंगाने सुपा पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी कायदा सुव्यवस्थेसाठी सज्ज झाले आहेत.

ब्रेंक दी चेन मोहिमेअंतर्गत करोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने बुधवारी रात्रीपासून दि. 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदीचे आदेश दिले आहेत. यात अत्यावश्यक सेवेसह काही ठराविक गोष्टींना वगळून बंदचे आदेश काढले आहेत. या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व करोना विषाणूची साखळी तोंडण्यासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येणे, चौकात बसणे, मास्क न वापरणे, बेकायदेशीर दुकाने, व्यवसाय चालू ठेवणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे यांनी दिली आहे.

सुपा पोलीस स्टेशन अंतर्गत 28 गावे असून 30 किलोमीटरच्या महामार्गासह दोन औद्योगिक वसाहती आहेत. यात या महामार्गावर दोन वाईनशॉपसह काही परमिट रुमचाही समावेश आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात ही ठिकाणे ठळक असतात. सुपा पोलिसांची याठिकाणी खास नजर असणार आहे. महामार्गावरील गव्हाणवाडी, म्हसणे फाटा टोल नाका व सुपा बसस्थानक चौकात कडक बंदोबस्त असेल.

सुपा पोलीस स्टेशनला एक वरिष्ठ अधिकारी, दोन सहायक अधिकार्‍यांसह महिला व पुरुष कर्मचारी मिळून 30 ते 35 कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचबरोबर ते काही होमगार्डचीही मदत घेत असतात. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये सुपा पोलिसांची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे.

करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन महत्त्वाचे आहे. अत्यावश्यक सेवा चालू ठेवल्या असल्यातरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. नियमांचे उल्लंघन करणारांवर कडक कारवाई ही करावीच लागेल. नागरिकांनी घरीच सुरक्षित रहावे ही विनंती.

- डॉ. नितीनकुमार गोकावे, पोलीस निरीक्षक सुपा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com