ऑक्सिजन प्रकल्पाच्या आवारात येण्यास बंदी

जिल्हा प्रशासन : प्राधिकृत व्यक्तिंनाच प्रवेश
ऑक्सिजन प्रकल्पाच्या आवारात येण्यास बंदी

अहमदनगर | प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रुग्णालयासह नगर एमआयडीसीमध्ये अन्य ठिकाणी असणार्‍या ऑक्सिजन प्रकल्पाच्या आवारात येण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. आता याठिकाणी केवळ प्राधिकृत केलेल्या व्यक्तींनाच प्रवेश मिळणार आहे.

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयांना मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये. यादृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144(1) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील उपविभागातील ऑक्सिजन रिफीलींग सेंटर आणि एजन्सी यांच्यामार्फत जिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो.

सद्य स्थितीत मेडिकल ऑक्सिजनची वाढती मागणी व होणार्‍या मागणीच्या अनुषंगाने अपुरा पुरवठा, यामुळे या प्लँटच्या ठिकाणी खाजगी रुग्णालयामधील कर्मचारी तसेच नागरिक देखील येऊन ऑक्सिजनची मागणी करून वाद घालण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ऑक्सिजन स्टोरेज प्लँटचे ठिकाण व उर्वरित रिफीलर यांचे प्लॅन्टचे परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये.

यादृष्टीने या प्लँटच्या 100 मीटर परिसरात कोणालाही प्रवेशाला मिळणार नाही. केवळ प्राधिकृत केलेल्या व्यक्तींना या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com