जिल्ह्यातील संचारबंदी अधिक कडक

किराणा, भाजीपाला अन् पट्रोल || सकाळी 7 ते 11 दरम्यानच मिळणार || आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी
जिल्ह्यातील संचारबंदी अधिक कडक
जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाढता करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या

सुचनेनूसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी रात्री जिल्ह्यातील किरणा दुकान, भाजीपाला विक्री, मटन, अंडी, चिकन, दुग्धजन्य पदार्थ विक्री आणि पेट्रोल पंप हे सकाळी सात ते 11 याच दरम्यान सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत. हे आदेश आज (दि.18) मध्य रात्रीपासून 1 मे पर्यंत लागू राहणार आहेत. दरम्यान, सकाळी 11 नंतर पेट्रोल पंपावरील सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवेतील वाहतूक आणि माल वाहतुकीसाठी डिझेल विक्री सुरू राहणार आहे.

वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने आधीच राज्यात संचार बंदी लागू केलेली आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात रस्त्यावरील गर्दी कमी होत नसून करोना बाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या सुचनेनूसार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यात संचारबंदीचे नियम अधिक कडक केले आहेत.

नव्या आदेशात जिल्ह्यात किराणा दुकान, दुध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला, फळे, अंडी, मटन, चिकन, मासे, कृषी संबधीत दुकाने, पशूखाद्य आणि पेट्रोल पंप यांच्या वेळा निश्चित केल्या आहेत. यात सवलत असणारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि पेट्रोल पंप हे सकाळी 7 ते 11 याच दरम्यान सुरू राहणार आहेत. त्यानंतर ही दुकाने बंद राहणार आहेत.

- सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवेतील वाहतूक आणि माल वाहतुकीसाठी पेट्रोल पंपावर डिझेल विक्री सुरू राहणार आहे. मात्र बंदी घातलेल्या वेळेत सामान्यांना पेट्रोल मिळणार नाही.

- पूर्वीच्या आदेशानूसार हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटवरून पिक सेवेऐवजी होम डिलेव्हरी मिळणार आहे.

- धार्मिक स्थळे, आठवडे बाजार पूर्णपेण बंद राहणार असून भाजीपाला आणि फळांच्या द्वार विक्रीस परवानगी आहे.

- रिक्षा आणि अन्य वाहने ही अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार आहे.

- विवाह समारंभास बंदी असून दुचाकीवर अत्यावश्यक सेवेसाठी दोघांना प्रवासाची सवलत आहे.

- सर्व प्रकारची खासगी बांधकामे, ई-सेतू आणि आधार केंद्र पूर्णपणे बंद राहणार आहेत.

- बेकरी आणि मिठाई दुकानेही बंद राहणार असून खासगी कार्यालय, सलून, ब्युटी पार्लरही बंद ठेवण्यात येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com