सांस्कृतिक कार्यक्रमांना 100 टक्के क्षमतेने परवानगी द्यावी - डॉ. गावित्रे

सांस्कृतिक कार्यक्रमांना 100 टक्के क्षमतेने परवानगी द्यावी - डॉ. गावित्रे

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

सध्या करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असून सध्या करोना नामशेष होण्याच्या मार्गावर आला असल्याने अटी व शर्ती कमी करून चित्रपट, नाट्यग्रह व विविध सांस्कृतिक कार्यक्रम शासनाने शंभर टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश चिटणीस डॉ. अशोक गावित्रे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

डॉ. अशोक गावित्रे यांनी निवेदनात म्हटले आहे की, करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे शासनाने करोना संदर्भात अटी व शर्ती लागू केल्या होत्या. त्या आता हळुहळू कमी होत असल्या तरी चित्रपटगृहे, नाट्यगृहे फक्त पन्नास टक्के क्षमतेने सुरू आहेत. मात्र त्यामुळे निर्माता, कलाकार यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. या सत्रामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे मोठ्या संख्येने लोक आहेत. त्यांनाही आर्थिक फटका बसत आहे.त्याचबरोबर तमाशा व तत्सम कला, सांस्कृतिक कार्यक्रम यांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असल्याने अटी व शर्ती कमी करत चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तमाशा व अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना शंभर टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास आता शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com