मानोरी पेट्रोलपंपावरील गर्दी देतेय करोनाला आमंत्रण

कर्मचार्‍यांकडून ग्राहकांना शिविगाळ
मानोरी पेट्रोलपंपावरील गर्दी देतेय करोनाला आमंत्रण

आरडगाव (वार्ताहर) - राहुरी तालुक्यातील पूर्वभागातील मानोरी परिसरामधील पेट्रोल पंपावर कर्मचारी ग्राहकांबरोबर कायमच हुज्जत घालत असल्याच्या तक्रारी आहेत.त्यामुळे ग्राहकांना नाहक मनःस्ताप झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा असताना एका उर्मट पेट्रोलपंप कर्मचार्‍याने अनेक लोकांसमोर शिवीगाळ करून आमच्या या इंडियन पेट्रोल पंपावर परत आले तर मारील, अशी धमकी देखील दिली. तशी तक्रार सेल्स ऑफीसर यांच्याकडे केली असून कारवाईची मागणी केली असल्याचे योगेश सुदाम काळे यांनी म्हटले आहे.

पेट्रोल पंपावर कायम दोन कर्मचारी असावे, असा नियम आहे. पण येथे सकाळी कायमच एकच कर्मचारी असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे याठिकणी करोनाला आमंत्रण दिले जात आहे. याच गर्दीमधे हा कर्मचारी हातसफाई करतो. तसेच अनेक वेळा पेट्रोल गाडीत डिझेल तर डिझेल गाडीत पेट्रोल टाकल्याचे प्रकार देखील घडत असल्याने अनेकांना त्रास झाला असल्याचा देखील आरोप योगेश काळे यांनी केला आहे.

तसेच येथे 24 तास हवा व पिण्यासाठी पाणी असावे, असा नियम आहे. तरी येथील हवा भरण्याचे मशिन कायम बंद स्थितीत असते. तरीही याची कधीही तक्रार न करता सातत्याने आम्ही या ठिकाणी पेट्रोल भरतो. पण जर कर्मचारी प्रतिष्ठीत व्यक्तींना अशी शिविगाळ करत असेल तर हा प्रकार लांछनास्पद आहे.त्यामुळे येथील पेट्रोल पंपावर कारवाईची मागणी योगेश काळे यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com