अहमदनगर (प्रतिनिधी)-

ग्रामपंचात निवडणुकीच्या मतदानादरम्यान मतदार राजांचे तापमान तपासून त्याला मतदान केंद्रात सोडण्यात येईल, मतदारांचे बोट सॅनेटाईझ करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

प्रत्यक्षात तसेच काही झालेले नसल्याचे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रावर दिसले. अचानक मतदारांनी गर्दी केल्याने करोना नियमांचा फज्जा उडालेला दिसला.

जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 7.30 पासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. सुरूवातीच्या पहिल्या दोन तासात मतदानाचा वेग मंद होता. मात्र, सकाळी दहानंतर जिल्ह्यातील बहुतांशी मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. यामुळे मतदारांच्या मोठा रांगा लागल्या. यावेळी काहींनी मास्क देखील बांधलेले नव्हते. मतदान केंद्रावर येणार्या मतदारांचे तापमान न मोजता त्यांना मतदान केंद्रात सोडण्यात येत होते.

मतदान कक्षात देखील गर्दी झाल्याने मतदार एकमेंकांना खेटून उभे होते. त्या ठिकाणी मतदारांचे बोट सॅनेटाईझ न करता थेट मतदान करण्यात येत होते. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान केंद्रावर करोनाचा नियमांचा फज्जा झाल्याचे चित्र होते. यासह मतदानाची प्रक्रियाही देखील गर्दी वाढल्याने वेळखाऊ झाल्याचे दिसत होते.