मुसळधार पावसाने पिके पाण्याखाली

मुसळधार पावसाने पिके पाण्याखाली

सोयाबीन पाण्यात, ऊसही भुईसपाट | पंचनामे करण्याची मागणी

राहाता (तालुका प्रतिनिधी)

दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने केलवड भागातील सोयाबिन, मका यासारखे पाण्याखाली गेले आहेत. तर उसाचेही नुकसान झाले आहे.

केलवड व परिसरात ३ व ४ ऑक्टोबरला मुसळधार पाऊस झाला. या पावसाने केलवड भागातील काही तलाव पूर्ण क्षमतेने भरले. त्यातून पाणी बाहेर येऊन शेतात साठले गेले.

केलवडच्या आडगाव रोड व खडकेवाके रोड भागातील शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनच्या उभ्या पिकांवर अर्धा फूट पाणी साठले आहे. केलवड येथील गमे, घोरपडे, वाघे, गोर्डे यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतात पाणी साठल्याने पिके पाण्यात बुडाली आहेत. काढणीस आलेली सोयाबीन पाण्याखाली बुडाल्याने या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. तर काही सोयाबीन १५ दिवसांनी काढणीस येणार होती. तसेच उसाचे पीकही भूईसपाट झाली आहेत.

शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे ८० टक्के क्षेत्र पाण्याखाली आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविला असेल त्यांना विमा मिळावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.