सरकारच्या पिक कर्जाचे व्याज शेतकर्‍यांच्या खाती वर्ग

जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांची माहिती
शिवाजी कर्डिले
शिवाजी कर्डिले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा सहकारी बँकेमार्फत जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना अल्प मुदत पिक कर्जासाठी केंद्र व राज्य शासनाचे 3 टक्के व्याज सवलत योजनेची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खाते जमा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी दिली.

जिल्हा सहकारी बँक दरवर्षी प्राथमिक विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या शेतकरी सभासदांना मोठ्या प्रमाणात अल्प मुदत पिक कर्ज पुरवठा व पशुपालन खेळते भांडवल कर्ज पुरवठा करते. यात शेतकर्‍यांनी तीन लाखपर्यंत अल्प मुदत कर्जाची नियमित परतफेड केल्यास केंद्र शासन 3 टक्के व राज्य शासनाचे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत 3 टक्के या प्रमाणे 6 टक्के व्याज सवलत देण्यात येते. ही व्याज सवलत रक्कम शासनाकडून प्राप्त झालेनंतर लगेच पात्र कर्जदार शेतकर्‍याचे बँक खात्यात जमा करण्यात येते.

पुर्वी सरकारकडून व्याज सवलत रक्कम बँककडे जमा होत होती. त्यावेळी बँक ती रक्कम संबंधीत विकास कार्यकारी सेवा संस्थेच्या सुरू असणार्‍या खात्यात वर्ग केली जात होती. यात शेतकर्‍यांकडून व्याज वसुल केले जात नव्हती. मात्र, 2019-20 पासून व्याज सवलत रक्कम सभासदांच्या बचत खाती जमा करावे अशा सुचना सहकार खात्याने 2018 ला दिल्या.

यात शेतकरी सभासदांकडून अल्प मुदत कर्जाची रक्कम वसुल करतांना व्याज वसुल करून घेतले जात. ही व्याज सवलत रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर शेतकर्‍याचे बँक खाती जमा होते. काही वेळा ही रक्कम शासनाकडून उशीरा प्राप्त होते. यामुळे शेतकर्‍यांना ही रक्कम उशिराने मिळते. बँक शासनाकडून येणारी व्याज सवलत रक्कम वापरत नाही. यात शेतकरी सभासदांची कोणीही दिशाभुल करू नये, असे आवाहन अध्यक्ष कर्डिले यांनी केले आहे.

अशी आहे स्थिती

या व्याज सवलत योजनेते नाबार्डकडून 2020-21 साली 3 टक्के व्याज सवलत 2 लाख 27 हजार 902 शेतकर्‍यांना 33.56 कोटी रक्कम 22 जुलै 2022 रोजी बँकेस प्राप्त झाली. ही रक्कम त्याच दिवशी तालुका शाखांना कर्जदार शेतकरी सभासदांच्या बँक खाती जमा करण्यात आली. 2021-22 सालाचे 3 टक्के व्याज सवलत प्रस्ताव 2 नाव्हेंबर 2022 रोजी 2 लाख 27 हजार 902 शेतकर्‍यांचे 32. 81 कोटींचे प्रस्ताव नाबार्डला सादर केलेला आहे. अद्याप रक्कम प्राप्त झालेली नाही. तसेच राज्य सरकारच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत 2019-20 पर्यंततचे व्याज सवलतीचे प्रस्ताव मंजुर आहेत. ही व्याज सवलतीची रक्कम शासनाकडून कर्जदार शेतकरी सभासदांचे बँक खाती जमा केलेली आहे. 2020-21 सालाचे जिल्ह्यातील 2 लाख 7 हजार 650 कर्जदार शेतकरी सभासदांचे 29.30 कोटींची रक्कम शासनाकडे प्रलंबित आहेत.2021-22 सालातील जिल्ह्यातील 2 लाख 53 हजार 782 कर्जदार शेतकरी सभासदांचे व्याज सवलत रक्कम 56.09 कोटी शासन स्तरावर हेही प्रलंबित असल्याची माहिती चेअरमन कर्डिले यांनी दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com