पिक विमा मिळाल्यावर श्रेय घेणारे पुढारी विमा न मिळाल्यावर गप्प का?
पीक विमा योजना

पिक विमा मिळाल्यावर श्रेय घेणारे पुढारी विमा न मिळाल्यावर गप्प का?

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

पिक विमा कंपन्याकडुन (Crops Insurance Company) गेल्या वर्षापर्यंत पिक विम्याचे बर्‍यापैकी परतावे शेतकर्‍यांना मिळत होते. मिळालेल्या विम्याचे श्रेय घेण्यासाठी प्रत्येक मतदार संघातील लोकप्रतिनिधी (Representative of the constituency) पत्रके काढुन मिळालेल्या परताव्यांचे श्रेय लाटत होते. चालू वर्षी शेतकर्‍यांना पिक विमे मिळालेच नाही मात्र दरवर्षी मिळालेल्या पिकविम्यांचे श्रेय (Credit Crops insurance) घेणारे बहुंताश पुढारी याविषयी मुक गिळून बसले असल्याने शेतकर्‍यांमधुन संताप व्यक्त होत असून या पुढार्‍यांच्या हातात पिक विम्याचे काहीच नसुन केवळ लोकांना वेड्यात काढण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा शेतकर्‍यांमधून होत आहे.

गेल्या वर्षीपर्यंत शेतकर्‍यांच्या पिकांचे कोरडया व ओल्या दुष्काळामुळे नुकसान झाल्यामुळे मोठया प्रमाणात पिक विम्यांचे परतावे मिळत होते. नुकसान ग्रस्त शेतकरीही (Loss Farmers) यामुळे समाधानी होते. मात्र प्रत्येक मतदार संघातील पुढारी पिक विमे मिळाल्यावर हे विम्यांचे परतावे मिळण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले, किती पाठपुरावा (Follow up) केला याबाबत पत्रके काढुन श्रेय लाटत होते.

गेल्या खरीपात अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे प्रंचड नुकसान झाले.अगदी राज्य सरकारनेही (State Government) शेतकर्‍यांना एकरी साडेचार हजारांची मदत (Help) केली. शेतकर्‍यांनी हजारो रूपयांचे विमे हप्तेही भरले होते. दुदैवाने विमा कंपन्याकडुन पिक विम्याचे परतावे मिळाले नाही. दरवर्षी पिक विमे मिळाल्यावर परताव्यांचे श्रेय घेणारे पुढारी मात्र विमे न मिळाल्यावर मुक गिळुन बसल्याचे चित्र आहे.

विमा कंपन्याकडुन परतावे मिळाले की श्रेय घ्यायचे मात्र विमा कंपन्यांनी परतावे नाकारले की गप्प बसायचे अशी दुतोंडी भुमीका पुढारी (Political Leder) सोयीस्कर पणे घेतात हे शेतकर्‍यांच्या चालु वर्षी लक्षात आले असुन पिक विम्याचे परतावे मिळण्यात श्रेय घेणारे पुढारी यांचे काहीच योगदान नसुन केवळ नैसर्गीक आपत्ती व शासनाकडुन लागु करण्यात आलेले निकष यात बसल्यास कंपन्याकडुन पिक विमे दीले जातात याची जाणीवही शेतकर्‍यांना होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com