पिकांची नुकसानभरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिकांची नुकसानभरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

वीस दिवसांपासून शहर तसेच तालुक्यातील बहुसंख्य गावात पाऊस पडत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने अतिवृष्टी ठिकाणच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार व तलाठी वर्गाला देऊन नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी नगरसभा आंदोलनाचे अध्यक्ष राजेश डांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पोर्टल व ईमेलद्वारे केली आहे.

डांगे यांनी म्हटले आहे की, गत महिन्यात पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर असताना सप्टेंबर च्या सुरुवातीलाच पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने कपाशी, सोयाबीन, तुरी पीकांना संजीवनी मिळाली. परंतु वीस दिवस संततधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. अतिवृष्टीमुळे अक्षरश: गुडघ्या इतक्या पाण्यात सडत आहेत. उडीद, तूर, मूग,बाजरी, कपाशी, सोयाबीन, मका,लिंबोणी, तसेच ऊस, ही सर्व पिके अतिवृष्टीमुळे शंभर टक्के जाण्याच्या मार्गावर आहेत.

यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील तहसीलदार, कामगार तलाठी यांच्यामार्फत गावातील पिकांची पाहणी करून त्वरित पंचनामे करून शेतकर्‍यांना मदत मिळवून द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. लम्पी रोगाने दुभती जनावरे दगावण्याच्या भीतीने शेतकरी पूर्ण खचत आहे. एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे लम्पी यातून सरकारने शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी डांगे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com