श्रीगोंद्याला पीकविमा मंजूर

२० हजार ७३८ शेतक-याना होणार लाभ
श्रीगोंद्याला पीकविमा मंजूर

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

तालुक्याला ८ कोटी ६८ लाख रुपयांचा प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत पीकविमा मंजूर झाला असून त्याचा लाभ तालुक्यातील २० हजार ७३८ शेतक-याना होणार आहे.

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील सन २०१८-१९ ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी पिकांसाठी एकूण २० हजार ७३८ शेतक-याना सुमारे ८ कोटी ६८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. विमा रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यावर थोड्याच दिवसात वर्ग होणार असल्याची माहिती आमदार पाचपुते यांनी दिली. विमा कंपन्यांकडे पिकविम्याची रक्कम भरूनही तालुक्यातील शेतकरी ज्वारी, गहू, हरभरा पिकविम्याच्या लाभापासून वंचित होते यासाठी आमदार पाचपुते हे पीकविमा कंपन्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करून शेतक-याना विमा मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील होते पाचपुते यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तालुक्यातील २० हजार ७३८ शेतक-याना ८ कोटी ६८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झालेला असून सदरची रक्कम लवकरच शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com