पिक विमा हप्त्याच्या बनावट पावत्या देऊन शेतकर्‍यांची 4 लाखांची फसवणूक

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पिक विमा हप्त्याच्या बनावट पावत्या देऊन शेतकर्‍यांची 4 लाखांची फसवणूक

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील 68 शेतकर्‍यांकडून (Farmer) 4 लाख 1 हजार 694 रुपये रक्कम घेवून त्यांना बनावट पिक विमा हप्त्याच्या पावत्या (Receipts of Crop Insurance Premium) देवुन त्यांची फसवणुक (Fraud) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. संगमनेर तालुक्यात (Sangamner Taluka) पिक विम्याच्या (Crop Insurance) नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक होत असल्याची चर्चा होत होती.

पिक विमा हप्त्याच्या बनावट पावत्या देऊन शेतकर्‍यांची 4 लाखांची फसवणूक
..अखेर निळवंडे धरणाच्या बोगद्याचे काम पुर्ण

तालुक्यातील जवळे कडलग येथील विनोद मधुकर सुर्वे व इतर शेतकर्‍यांची फसवणूक (Farmer Fraud) झाली होती. या शेतकर्‍यांनी सन 2018 मध्ये रब्बी ग्री कल्चरल ईन्शुरन्स कंपनी (Rabbi Gree Cultural Insurance Company) व 2019 मध्ये खरीप बजाज अलाईन्स जनरल ईन्शुरन्स कंपनी (Kharif Bajaj Alliance General Insurance Company) यांचेकडे विमा उतरवला होता. या विम्याची रक्कम न मिळाल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या शेतकर्‍यांच्या अर्जाची चौकशी करण्यात आली. यानंतर चौकशी अहवाल पिक विमा तक्रार निवारण समिती (Crop Insurance Grievance Redressal Committee) तथा तहसिलदार अमोल निकम यांनी जिल्हाधिकारी यांना 26 ऑगस्ट 2020 रोजी पाठविला होता. दि. 11 जुलै 2022 रोजी शेतकर्‍यांच्या विमा तक्रारी बाबतचा आदेश जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडुन तालुका कृषी अधिकार्‍यांना मिळाला.

पिक विमा हप्त्याच्या बनावट पावत्या देऊन शेतकर्‍यांची 4 लाखांची फसवणूक
मुळा धरण 60 टक्के भरले

यानंतर ई सुविधा केंद्र चालकाविरुद्ध फौजदारी कारवाई करणे बाबतचा आदेश प्राप्त झाला. सदर प्रकरणाची छाननी करून अवलोकन केले असता आपले सरकारसेवा केंद्र, मोमीनपुरा, संगमनेर येथील चालक प्रविण सुधाकर ताजणे याने सन 2018-19 रब्बी हंगामात 62 शेतकर्‍यांचे पिकविमा एकुण रक्कम 3,71,021 रुपयाची व सन 2019 ते 20 खरीप हंगामातील एकुण 68 शेतकर्‍यांचे पिक विमा हप्ता नोंदवुन त्यांना बनावट विम्याच्या पावत्या दिल्याचे कृषी अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले. सदर रक्कम ही शासनास अगर कंपनीकडे भरणा केला नसल्याचे कागदपत्राचे अवलोकन करता दिसुन आलेले आहे.

पिक विमा हप्त्याच्या बनावट पावत्या देऊन शेतकर्‍यांची 4 लाखांची फसवणूक
भंडारदरा ओव्हरफ्लोच्या मार्गावर

आपले सरकार ई महा सेवा केंद्र संगमनेर याचे मालक प्रसन्न गोरे व चालक प्रविण सुधाकर ताजणे रा. ढोलेवाडी यांनी शेतकर्‍यांकडुन पिक विमा हप्त्याची रक्कम घेवुन त्यांना बनावट पिक विमा हप्त्याच्या पावत्या दिल्या होत्या. याबाबत तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रवीण सुधाकर ताजणे (रा. ढोलेवाडी) व प्रसन्न गोरे (पूर्ण नाव माहित नाही, रा. संगमनेर) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 467, 468, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. शेतकर्‍यांची फसवणूक करणारे दोघे आरोपी फरार आहेत. यातील प्रवीण ताजणे हा दुबई येथे पळून गेला असल्याची चर्चा शहरात होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com