Crop Insurance : पिक विमा भरण्याची मुदत आज संपणार, शेतकऱ्यांकडुन मुदतवाढीची मागणी

दरवर्षी खरीप पिक विमा (Crop Insurance) भरण्याची मुदत ३० जुलै पर्यत असते
Crop Insurance : पिक विमा भरण्याची मुदत आज संपणार, शेतकऱ्यांकडुन मुदतवाढीची मागणी

पिंपरी निर्मळ l वार्ताहर l Pimpari Nirmal

दरवर्षी खरीप पिक विमा (Crop Insurance) भरण्याची मुदत ३० जुलै पर्यत असते. चालु वर्षी शासनाने ही मुदत कमी करत १५ जुलै केली आहे.

या वर्षी मान्सूनच्या पावसाचे (Monsoon rains) महीनाभर उशिरा आगमन झाल्याने मोठया प्रमाणात पेरण्याच बाकी आहेत. मात्र पेरण्या आधीच आज पिकविमा भरण्याची मुदत संपणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असुन विमा भरण्यासाठी मुदतवाढीची (Extension for payment of crop insurance) मागणी होत आहे.

सरकार कडुन शेतकऱ्यांच्या पिकांना नैसर्गिक आपत्तीपासुन संरक्षण (Protection from natural disasters) मिळण्यासाठी पिक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये योजनेनुसार शेतकऱ्यांना पीक विमा काढताना रब्बीसाठी १.५ टक्के, खरीप पिकांसाठी २ टक्के तर बागायतीसाठी ५ टक्के वाटा उचलावा लागतो. तर विमा हप्त्याची उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरते.

दरवर्षी खरीप पिकांच्या सोयाबीन, बाजरी, भुईमुग, मका आदी पिकांसाठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत ३० जुलै असते. मात्र चालु वर्षी शासनाने ही मुदत कमी करून १५ जुलै केली आहे. या वर्षी मान्सुनचा पाऊस जवळपास महीनाभर उशिरा आला. त्यामुळे मोठया बहुंतांशी पेरण्या खोळबंल्या होत्या.

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पावसाला सुरूवात झाली. चांगल्या ओलीमुळे वाफसा झाल्यावर पेरण्या सुरु होतील.मात्र पेरणी आधीच पिक विमा भरण्याची मुदत आज १५ जुलैला संपणार असल्यामुळे मोठया प्रमाणात शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहणार असल्याने शासनाने पिक विम्याची मुदत दरवर्षी प्रमाणे ३० जुलै पर्यत वाढवावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com