पीक नुकसानीची माहिती कंपनीस कळविणे आवश्यक

जिल्हाधिकारी डॉ. भोसले : ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा
पीक नुकसानीची माहिती कंपनीस कळविणे आवश्यक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात अतिवृष्टी (Heavy rain) व पुरामुळे (Flood) शेतीचे मोठे नुकसान (Farm Loss) झाले. विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाईसाठी नुकसानीची पुर्वसूचना विमा कंपनीस (Insurance company) 72 तासांमध्ये द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजने (Prime Minister Crop Insurance Scheme) अंतर्गत शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नियमानुसार नुकसान भरपाई (Indemnity) दावा दाखल करता येतो. त्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती, पुर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे. पीक विमा धारक शेतकर्‍यांंनी 1800 1032 292 या टोल फ्री क्रमांकावर किंवा portalqueries.pmfby@bhartiaxa.com या ई-मेलवर नुकसानीची पूर्वसूचना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी ऑनलाईन विमा कंपनीस ( Online insurance company) पूर्वसूचना देऊ न शकल्यास भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीचे तालुका प्रतिनिधी, संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबंधित कृषी सहाय्यक यांचेकडे ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com