तापमानवाढीचे संकट उभे ठाकल्याने जलसंधारणावर भर द्यावा लागेल

भानुदास मुरकुटे || अशोक महाविद्यालयाच्या हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा कमालपूर येथे समारोप
तापमानवाढीचे संकट उभे ठाकल्याने जलसंधारणावर भर द्यावा लागेल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

माणसाने निसर्गाचे नुकसान केल्याने निसर्गात विकृती निर्माण झाली आहे. झाडांची अमाप तोड झाल्याने जगापुढे तापमानवाढीचे संकट उभे ठाकले आहे. या संकटातून वाचायचे असेल तर निसर्गाचे संवर्धन तसेच जलसंधारणावर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा कमालपूर येथे समारोप झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री.मुरकुटे बोलत होते. यावेळी भास्करराव मुरकुटे, भास्कर खंडागळे, दिगंबर बारस्कर, वाल्मिक गोरे, वेणूनाथ मुरकुटे आदी उपस्थित होते.

श्री. मुरकुटे म्हणाले, शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळ, व्यायाम याकडेही लक्ष दिले पाहिजे. शरीर निरोगी असेल तर मन आनंदी राहते. श्रमामुळे जीवनाला स्वावलंबनाचे संस्कार लाभतात. जे धाडस करून कृती करतात तेच जीवनात यशस्वी होतात, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भास्कर खंडागळे यांनी स्वयंसेवकांना शिक्षणाबरोबर श्रमदानाचे महत्त्व सांगितले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनीता गायकवाड, प्रा. दिलीप खंडागळे, प्रा शिवाजी पटारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा भिमा शिंदे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. हिना शेख, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेवक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सदर शिबिराच्या कालावधीमध्ये जलसंवर्धन, व्यक्तिमत्व विकास, महिला सबलीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामसर्वेक्षण, स्वच्छता अभियान, युवा सबलीकरण, अक्षय उर्जा वापराबाबत जनजागृती, ॠखड चरिळिपस, इतिहास लेखन हे उपक्रम राबविण्यात आले.

याप्रसंगी कु.वैष्णवी माकोणे, कु.वर्षा उंडे, यश पवार, शुभम हळनोर या स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.सुनीता गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.दिलीप खंडागळे यांनी केले, तर प्रा.हिना शेख यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com