रोहिणीच्या भरवशावर उभारलेल्या खरीपावर दुबार पेरणीचे संकट

रोहिणीच्या भरवशावर उभारलेल्या खरीपावर दुबार पेरणीचे संकट
Farmer

वीरगाव |वार्ताहर| Virgav

पावसाळ्यात (Rain) संततधारेचा तालुका असणार्‍या अकोले (Akole) तालुक्यातील खरीपावर (Kharif) पाण्याअभावी नेस्तनाबूत होण्याची चिन्हे असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. रोहिणी नक्षत्रात (constellation Rohini) झालेल्या पावसानंतर शेतकर्‍यांनी धाडसाने खरीपाची पेर केली. रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रात पर्जन्ययोग जुळून न आल्याने पुनर्वसूचा तरण्या पावसाच्या नक्षत्रातही पाण्याने भरलेल्या ढगांचा विहार दिसत नसल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरील चिंता स्पष्ट जाणवते.

अकोले तालुका कृषी विभागाच्या (Akole Taluka Agriculture Department) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाजरी, सोयाबीन आणि मका या प्रमुख खरीप पिकांचा (Kharif Crops) पेरा जून अखेरपर्यंत मर्यादितच झाला. दरवर्षीच्या तुलनेत बाजरीची पेर 14.23 टक्के इतकी आहे. संभावित 5 हजार हेक्टर क्षेत्रापैकी अवघ्या 711.35 हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेर झाली. सोयाबीनचे क्षेत्रात (soybeans) मात्र दरवर्षीच्या तुलनेत वाढ झाली. 3 हजार 500 हेक्टरचा अंदाज असताना 4617.63 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचचा पेरा झाला. त्याची टक्केवारी 131.93 इतकी आहे. 3 हजार 500 हेक्टर संभावित मकाक्षेत्रापैकी 40.76 च्या टक्केवारीने 1426.55 हेक्टर मकाची लागवड झाली.

सोयाबीनसहित इतर तेलबियांचे लागवड (Cultivation of other oilseeds including soybeans) झालेले तालुक्यातील क्षेत्र 5 हजार 437 हेक्टर क्षेत्र आहे. पावसाच्या भरवशावर भात, नागली, तूर, मूग, उडीद, कारळे, भुईमूग, कांदा, भाजीपाला, चारा पिकेही शेतक-यांनी उभारली आहेत. पावसाचा मागमूस नाही, वाढलेली उष्णता आणि वाहते वारे यामुळे एकूण पेरीपैकी अवघे 25 टक्के खरीप अंकुरले. आकाशात ढगांची निदान गर्दी जरी असती तरी पुर्ण पेरा उतरुन पडला असता. परंतु रणरणीत उन्हाने खरीप जळून चालला आहे. पिकाला विहीरींचे (Well) पाणी द्यायचे ठरवले तरी कडक उन आणि वाहत्या वा-यांनी विहींरींचे पाणीही हबकून गेल्याची स्थिती आहे.

डिझेलच्या वाढत्या बाजारभावाने (डिझेलच्या वाढत्या बाजारभावाने) शेतीची मशागत महागली. नांगरट, पेरणीपुर्व मशागत, खते, बियाणे हा खर्च बाजरी आणि सोयाबीनचा एकरी अनुक्रमे 7 हजार आणि 10 हजार झाला. उष्णतेमुळे आलेल्या लष्करी अळीने मकाची हालत खराब केली. उसालाही पाण्याची मर्यादा आल्याने लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढला.चारापिकेही पाण्याअभावी धोक्यात आल्याने दुधाची धार कमी झाली.

पाऊस आणखीनच लांबला तर अकोले तालुक्यातील (Akole Taluka) पुर्ण खरीप हंगाम धोक्यात येईल. शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे असले तरी नक्षत्रांची दानत अजूनही देण्याची दिसत नाही. गेलेल्या तीनही नक्षत्रांनी धोका दिला असून आगामी नक्षत्रात तरी पावसाचे भरभरुन दान मिळेल अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. अन्यथा सध्या धोक्यात असलेला खरीप पुर्णच नेस्तनाबूत होईल.

करोनाबरोबर कोरडभय..!

पावसाने दडी मारल्याने मोसमी पावसाचा प्रवास रखडला आहे. अजूनही चार-पाच दिवस अशीच परिस्थिती राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. करोनामुळे छोटे-मोठे उद्याग, व्यापारावरही निर्बंध असल्याने खरीपाचा हंगामच आर्थिक स्थिरता देण्याचा अंदाज होता. पावसाने मारलेली दडी मारल्याने खरीपावर केलेला सारा खर्च वाया जाण्याची भिती आहे. करोना भयाच्या वातावरणात आता निसर्गाने कोरडभय निर्माण केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com