सराईत गुन्हेगार अजय पठारे जेरबंद

सराईत गुन्हेगार अजय पठारे जेरबंद

बालिकाश्रम रोडला टाकला होता दरोडा; मुख्य सूत्रधार विजय पठारे पसारच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सराईत गुन्हेगार विजय राजू पठारे, अजय राजू पठारे या पठारे बंधूंसह त्यांच्या इतर चार साथीदारांनी

बालिकाश्रम रोडवरील कापड दुकान तसेच निलक्रांती चौकातील सायकल मार्टच्या दुकानात मागील महिन्यात धुमाकूळ घालत कामगारांना मारहाण केली. त्यांच्याकडून बळजबरी पैसे वसूल केले होते. यातील अजय राजू पठारे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सिद्धार्थनगरमध्ये अटक केली.

विजय राजू पठारे, अजय राजू पठारे, सुरज साठे, राहुल झेंडे, अक्षय (पूर्ण नाव माहिती नाही) व मयूर चावरे (सर्व रा. सिद्धार्थनगर, नगर) यांच्याविरूद्ध तोफखान्यात गुन्हा दाखल आहे. अक्षय राजेंद्र जाधव (रा. बालिकाश्रम रोड) यांनी फिर्याद दिली आहे. अक्षय जाधव यांच्या बालिकाश्रम रोडवरील रूबाब द परफेक्ट मेन शॉप या कापड दुकानात पठारे बंधूंसह त्यांच्या इतर साथीदारांनी लाकडी दांडके घेऊन ‘तुम्ही आम्हाला कपडे फुकट द्यायचे, आम्हाला हप्ता द्यायचा. असे म्हणत दुकानातील सामान अस्तव्यस्त करून कामगार नन्नवरे यांच्याकडून पैसे व मोबाईल घेऊन विजय पठारे साथीदारांसह निघून गेला होता.

यानंतर तब्बल महिनाभराने अजय पठारे याला अटक करण्यात एलसीबीला यश आले. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार विजय राजू पठारे हा पसार आहे. तोफखाना पोलिसांसह एलसीबीच्या पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आलेले नाही. निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मिथून घुगे, सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, सागर ससाणे, अशोक काळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com