कोल्हार परिसरात वाहन चालकांना लुटणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

एलसीबीने 'या' ठिकाणी केली कारवाई
कोल्हार परिसरात वाहन चालकांना लुटणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर|Ahmedagar

महामार्गावर वाहन चालकांना लुटमार करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नवनागापूर परिसरात अटक केली.

शाहरुख सत्तार खान (वय २१ रा. जालना ह.रा. गजानन काॅलनी, नवनागपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

किशोर मोतीराम दुकळे यांना मनमाड रोडवर पंक्चर काढीत असताना आरोपी नामे किरण अर्जुन आजबे, शाहरुख खान व इतर साथीदार यांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले होते. ही घटना कोल्हार बुद्रुक शिवारात घडली होती. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्ह्यातील आरोपी शाहरुख खान नवनागापूर परिसरात असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालील अधिकारी व कर्मचारी यांनी खान याला नवनागापूर परिसरात अटक केली.

खान विरोधात जालना जिल्ह्यातील सदर बाजार, हसनाबाद, चंदनझिरा, कदीम जालना, जालना तालुका या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे दाखल आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com