सराईत गुन्हेगार टिंग्या गजाआड

बालिकाश्रम रोडवर युवकाला केली होती मारहाण
सराईत गुन्हेगार टिंग्या गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सराईत गुन्हेगार टिंग्या ऊर्फ सुमेध किशोर साळवे (रा. जाधव मळा, बालिकाश्रम रोड) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्याने यश राजेंद्र मकासरे (वय 20 रा. जाधवमळा, बालिकाश्रम रोड) या युवकाला मारहाण केली होती. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मित्राच्या बहिणीसोबत बोलायचे नाही, असे म्हणत टिंग्या साळवे याने यश मकासरे यांना मारहाण केली होती. पोलिसांत तक्रार देण्यासाठी जात असताना यशसह त्यांच्या आई-वडिलांना तलवार हातात घेऊन शिवीगाळ करत धमकी दिली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार एस. पी. गर्जे करीत आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर टिंग्या साळवे राहत्या घरीच होता. याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, एस. पी. गर्जे, शिरीष तरटे यांच्या पथकाने टिंग्याला राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द यापूर्वी तोफखाना पोलिसांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com