सराईत गुन्हेगाराकडून 6 जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा हस्तगत

सराईत गुन्हेगाराकडून 6 जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा हस्तगत

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील माळीचिंचोरा फाटा (Malichinchora Phata) शिवारात नेवासा पोलिसांनी (Newasa Police) गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद (Arrested) केला आहे.

सराईत गुन्हेगाराकडून 6 जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा हस्तगत
श्रीरामपूरला वाघ, संगमनेरला वाघचौरे, शिर्डीला मिटके

याबाबत हवालदार शाम बाबासाहेब गुंजाळ यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, सोमवार 22 मे रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्य सुमारास माळीचिंचोराफाटा येथे एक इसम संशयीतरित्या फिरत असताना दिसल्याने पोलीस पथकाने घेराव घालून त्याला नाव गाव विचारले असता त्याने आकाश संजय पवार (वय 23 रा. ब्रम्हतळे, ब्रम्हनगर नागरदेवळे, भिंगार ता. जि. अहमदनगर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे उजव्या हातामध्ये असलेला गावठी कट्टा (पिस्टल) (Gavathi Katta) व पँटच्या डाव्या खिशामध्ये सहा जिवंत काडतुसे (Cartridges), एक मोबाईल व त्याची वापरती एक मोटारसायकल (Bike) असा मुद्देमाल मिळून आला.

सराईत गुन्हेगाराकडून 6 जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा हस्तगत
UPSC : नगर जिल्ह्यातील सात मराठी मुलं अव्वल

सदर इसमास ताब्यात घेवून नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) गु.र.नं 556/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7/27 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, महिला पोलीस नाइरक सविता उंदरे, कॉन्स्टेबल सुमित करंजकर, गणेश ईथापे यांनी केली असुन पुढील तपास उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हे करीत आहेत.

सराईत गुन्हेगाराकडून 6 जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा हस्तगत
गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणारा तरुण जेरबंद
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com