'निवड प्रक्रियेत खोट्या सह्या करणाऱ्या बनावट प्रतिनिधींवर फौजदारी गुन्हे दाखल करा'

मुसळवाडीसह नऊगाव प्रादेशिक पाणी योजनेचे माजी अध्यक्ष अमृत धुमाळ व सदस्यांची मागणी

आरडगांव | वार्ताहर

'दोन महिला सदस्य गैरहजर असतांना संबंधितांनी बनावट प्रतिनिधी हजर करून प्रोसेटिंग खोट्या सह्या करत गुप्त पध्दतीने मतदान घेण्याचा आग्रह धरला. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण करून खोट्या सह्या केल्याचे लक्षात येता मतदान प्रक्रिया रद्द करून त्या ठिकाणाहून पळ काढला. अशा बनावट प्रतिनिधीचा कुठलाही संबंध नसताना निवड प्रक्रियेत खोट्यासह्या करणाऱ्या बनावट प्रतिनिधींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे' अशी मागणी मुसळवाडीसह नऊगाव प्रादेशिक पाणी योजनेचे माजी अध्यक्ष तथा सरपंच अमृत धुमाळ व सदस्यांनी केली आहे.

'निवड प्रक्रियेत खोट्या सह्या करणाऱ्या बनावट प्रतिनिधींवर फौजदारी गुन्हे दाखल करा'
मुसळवाडीसह नऊगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया रद्द

राहुरी पंचायत समितीच्या स्व डॉ.दादासाहेब तनपुरे सभागृहात सोमवार दि. 28 जुन रोजी मुसळवाडीसह नऊगांव प्रदिशिक पाणी योजनेच्या अध्यक्षपदाची निवड आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष पदाची निवड लोकशाही पध्दतीने न करता दबावतंत्राचा वापर करून या निवडीत अचानक सतरावा सदस्य आला कुठुन या मुद्यावरून सरपंचांसह सदस्यांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाल्याने हि निवड रद्द करण्यात आली होती. अध्यक्षपदाच्या निवडीवरुन सरपंचासह सदस्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याने हि कशी होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अध्यक्षपदाच्या निवड लोकशाही पध्दतीने व शांतपणे पार पडवी हि इच्छा आहे. पंरतु संबंधितांनी बनावट प्रतिनिधी हजर करून प्रोसेटिंग वर खोट्या सह्या करुन निवड प्रक्रियाचा भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब निवडणूक प्रक्रियेला धरून नसल्यामुळे त्यांच्यावर निवडणूक प्रक्रिया अंतर्गत आशा दोषींवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावे. यासाठी मागणी साठी लवकरच योजनेच्या सदस्यासह राहुरी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांची भेट घेणार आहोत.

अमृत धुमाळ, माजी अध्यक्ष, मुसळवाडीसह नऊगाव पाणी योजना

या योजनेवर पाच महिला सदस्य असताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी तीनच महिला सदस्य हजर होत्या. परंतु त्या मध्ये दोन महिला गैरहजर असतानाही त्यांच्या खोट्या सह्या करण्यात आल्या तरी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.

सारिका घोलप, सदस्य मुसळवाडी

ही योजना सुरू झाल्यापासून कोपरे व सेनडगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे पुर्वी पासून तीन सदस्य या योजनेवर असताना परंतु हा तिसरा सदस्य आला कुठून या वादाला कुठले ही तथ्य नाही. चुकीची भूमिका आहे.

नानासाहेब जाधव, सरपंच, कोपरे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com