प्रकरण मिटविण्यासाठी केली पाच लाखांची मागणी

प्रकरण मिटविण्यासाठी केली पाच लाखांची मागणी

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

अत्याचाराच्या गुन्ह्यातील (Crimes of Atrocities) आरोपीकडून 5 लाख रुपये घेऊन दे, तरच गुन्हा मिटविन नाही तर तुझी बायको कर्जतला (Karjat) आली तर तमाशात पाठवून नाचायला लावीन असे धमक देत शिविगाळ करून मारहाण केली. तसेच तुला जिवंत सोडणार नाही असे सांगत धमकावल्या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनला (Karjat Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

31 ऑक्टोबर रोजी कुळधरण (Kuldharan) येथे दहिश्वर उचल्या भोसले (वय 22, रा. टाकळी ता. करमाळा जि सोलापूर, हे त्यांच्या बहीणीकडे असताना बलात्कार (Rape) गुन्ह्यातील आरोपीकडून पाच लाख रुपये घेऊन दे तरच गुन्हा मिटविन नाहीतर तुझी बायको कर्जतला (Karjat) आली तर तमाशात पाठवून नाचायला लावीन असे म्हणाला. आरोपी शोभा सत्यवान भोसले व सत्यवान चंद्रकांत काळे शिविगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली.

धनराज काळे यांनी लोखंडी कुकरी डोक्यात मारून दुखापत केली. तसेच ताकदीर सत्यवान काळे यांनी पाठीत दगड मारला आणि म्हणाला तु जर कर्जतमध्ये (Karjat) दिसला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. घटनास्थळी माळशिकारे यांनी भेट (Visit) दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com