नेवासामध्ये आंदोलकांवर गुन्हे दाखल
सार्वमत

नेवासामध्ये आंदोलकांवर गुन्हे दाखल

राज्यभरात दुध दरवाढीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे

Nilesh Jadhav

नेवासा | वार्ताहर | Newasa

दुधाला सरसकट १० रुपये अनुदान द्यावे, प्रती लिटर दुधाला ३० रुपये दर द्यावा व दूध भुकटीसाठी प्रती किलो ५० रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी नेवासा तालुका भाजपच्या वतीने आज सकाळी नेवासा बसस्थानकावर रास्तारोको आंदोलन केले.

सदरील आंदोलकांना रास्ता रोको करू नये यासाठी नोटीस देखील बजावली होती. तरी देखील आंदोलनकर्त्यानी आंदोलन केल्याने पोलीस कॉन्स्टेबल प्रतापसिह दहिफळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून भाजपाचे माजी आमदारासह जिल्हा अध्यक्ष गोंदकर, तालुका अध्यक्ष दिनकर, शहर अध्यक्ष पारखे व इतर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com