शहर सहकरी बँकेच्या चेअरमन, व्हा.चेअरमनसह संचालकमंडळाविरूद्ध गुन्हा
सार्वमत

शहर सहकरी बँकेच्या चेअरमन, व्हा.चेअरमनसह संचालकमंडळाविरूद्ध गुन्हा

पावणेतीन कोटी रक्कमेचा अपहार

Sachin Daspute

Sachin Daspute

अहमदनगर । प्रतिनिधी । Ahmednagar

सिक्युरिटीसाठी घेतलेल्या चेकचा गैरवापर करून कर्जदाराच्या खात्यातील पावणेतीन कोटी रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी शहर सहकरी बँकेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालकमंडळ, सचिव, शाखाधिकारी यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बाबुलाल सुमरेमल बच्छावत (रा. भिस्तबाग, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झाल्यामध्ये बँकेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सचिव, झेंडीगेट शाखेचे शाखाधिकारी, कँशिअर, चेक पास करणारे सर्व कर्मचारी यांच्यासह सर्व संचालक मंडळाचा समावेश आहे. फिर्यादी यांनी शहर सहकारी बँकेच्या झेंडीगेट शाखेकडून तीन कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. यासाठी त्यांनी सिक्युरिटी म्हणून बँकेकडे 10 चेक दिले होते. या चेकचा गैरवापर करून वेगवेगळ्या आठ खात्यावर दोन कोटी 73 लाख 55 हजार रूपयांची रक्कम अदा केली असल्याचे फिर्यादी म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com