सात गुन्ह्यांतील फरार पाच आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
सात गुन्ह्यांतील फरार पाच आरोपी अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन दिवस विशेष मोहीम राबवून दरोडा, दरोड्याची तयारी, चोरी व खुनाचा प्रयत्न अशा सात गंभीर गुन्ह्यातील फरार संशयित आरोपींना अटक केली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील सुरेश फकट्या चव्हाण (रा. गुंडेगाव, ता. नगर) तसेच चोरीच्या गुन्ह्यातील सोमनाथ बाळु मोरे (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर), गोविंद आण्णा गायकवाड (रा. उंबरगाव, ता. श्रीरामपूर), कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यातील नामदेव बडोद भोसले (रा. पढेगाव, ता. कोपरगाव, हल्ली रा. बुरूडगाव रस्ता, ता. नगर) व राहाता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खूनाचा प्रयत्न गुन्ह्यातील संपत उर्फ संप्या शंकर वायकर (रा. पुणतांबा, ता. राहाता) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, अंमलदार बाळासाहेब मुळीक, विश्वास बेरड, रवींद्र कर्डिले, संदीप दरदंले, विशाल दळवी, फुरकान शेख, सागर ससाणे, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर व उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com