शिवसेनेच्या दक्षिण उपजिल्हाप्रमुखावर खंडणीचा गुन्हा

आरोपीमध्ये सहा जणांचा समावेश
शिवसेनेच्या दक्षिण उपजिल्हाप्रमुखावर खंडणीचा गुन्हा

अहमदनगर|Ahmedagar

गाळा बांधकाम करायचे असल्यास प्रत्येक गाळ्या मागे पाच हजार याप्रमाणे 12 गळ्याचे 60 हजार रूपये हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत एकास खंडणी (Ransom) मागितल्याप्रकरणी शिवसेनेचा नगर दक्षिण उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधवसह (Shivsena South Deputy District Chief Girish Jadhav) सहा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police station) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय रमेश सामलेटी (रा. तोफखाना) यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल (Filed a crime) झाल्यामध्ये जाधवसह त्याचा भाऊ राजेश जाधव, बाळासाहेब जाधव, चेतन जाधव, भागीरथ बोडखे, प्रतिक बोडखे यांचा समावेश आहे. 12 जुलै ते 15 जुलै दरम्यान ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांंनी (Police) दिलेली माहिती अशी की, विजय सामलेटी यांच्यासह श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) व त्यांच्या ओळखीचे इतर लोक दिल्लीगेट (Delhigate) येथे सामलेटी यांना गाळा भाड्याने घ्यायचा असल्याने तो गाळा पाहण्यासाठी गेले होते. गाळ्याची देखरेख करत असताना गिरीश जाधवसह त्याचे इतर भाऊ व साथीदार त्याठिकाणी आले.

यावेळी ते श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) यांना म्हणाले, हे गाळे तुम्ही येथे कसे उभे केले, तु मला विचारल्याशिवाय मिळकतीत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे नाही. तुला काही बांधकाम करायचे असल्यास प्रत्येक गाळ्यामागे पाच हजार याप्रमाणे 12 गाळ्याचे 60 हजार रूपये हप्ता द्यावा लागेल. माझ्यावतीने आमचा कोणीही माणूस येईल आणि हप्ता घेऊन जाईल. त्याची पुर्तता अगोदरच करून ठेवायची, असा दम दिला. मी सांगितलेला सल्ला ऐकणार नसाल तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुझा कायमचा बंदोबस्त करू, अशी धमकी (Threat) दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे (Assistant Inspector of Police Dinkar Mundhe) करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com