1 हजार 400 किलो गोमांस जप्त

शहर पोलिसांचा झेंडीगेट परिसरातील कत्तलखान्यावर छापा
1 हजार 400 किलो गोमांस जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने शहरातील झेंडीगेट परिसरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला.

या छाप्यादरम्यान पोलिसांनी 2 लाख 52 हजार रुपये किंमतीचे 1 हजार 400 किलो गोमांस, 11 लाख रुपये किंमतीचा टेम्पो (क्र. एमएच- 16 सीसी- 614) असा 13 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुधवारी रात्री उशीरा पोलिसांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी आसिफ गुलाम दस्तगीर (वय- 33), शहानुर इस्माईल शेख (वय- 36), मोईन असरार सय्यद (वय- 35), मोहम्मद गौस कुरेशी (वय- 35), निहाल इस्माईल कुरेशी (सर्व रा. झेंडीगेट), सलमान अजिज शेख (रा. कोठला) यांच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झेंडीगेट परिसरातील एका बंद रूममध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती उपअधीक्षक ढुमे यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कर्मचारी सुयोग सुपेकर, हेमंत खंडागळे, सचिन जाधव, महेश मगर, बाबासाहेब फसले, सागर द्वारके यांना सोबत घेऊन बुधवारी रात्री उशीरा झेंडीगेट परिसरातील बंद रूममध्ये छापा टाकला.

यावेळी त्याठिकाणी गोमांस मिळून आले. वाहतूक करण्यासाठी एक टेम्पोही मिळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पो. अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com