नगर: मागील भांडणाच्या कारणातून तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

सात जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा
नगर: मागील भांडणाच्या कारणातून तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

मागील भांडणाच्या कारणातून सात जणांनी तरूणाला लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

शहरातील रामवाडीमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली. या मारहाणीत कृष्णा चंद्रकात घाटविसावे (रा. रामवाडी, नगर) या तरूणासह त्याची आई सुशिला चंद्रकांत घाटविसावे व वडिल चंद्रकांत घाटविसावे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सुशिला घाटविसावे यांनी फिर्याद दिली आहे.

मारहाण करणारे सनी गायकवाड, राम गायकवाड, किसन गायकवाड, भागचंद गायकवाड, बॉबी गायकवाड, रोहित गायकवाड व एक अनोळखी (सर्व रा. रामवाडी) यांच्याविरूद्ध भादवि कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री कृष्णा व त्याचे आई-वडील त्यांच्या रामवाडी येथील घरी असताना आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी मागील भांडणाच्या कारणातून कृष्णा याला लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण करण्यास सुरूवात केली.

यावेळी मध्ये आलेल्या कृष्णाच्या आई- वडीलांना आरोपींनी मारहाण केली. या मारहाणीत कृष्णा याला जास्त मार लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दुसर्‍या गटाचे सनी गायकवाड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा घाटविसावे व चंद्रकांत घाटविसावे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोघांनी मारहाण केली असल्याचे सनी यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com