मोर्चाचा फोटो स्टेटसला ठेवल्याने युवकाला मारहाण

भिंगार हायस्कूलमधील घटना || गुन्हा दाखल
मोर्चाचा फोटो स्टेटसला ठेवल्याने युवकाला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगारमधील हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय युवकाला तरूणांनी मारहाण केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली आहे. नगर शहरात बुधवारी झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाचा फोटो स्टेटसला का ठेवला यावरून ही मारहाण झाली. याप्रकरणी मारहाण झालेल्या युवकाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमन शेख, रेहान, अत्तर, फैजल (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. आलमगीर, भिंगार) यांचाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मारहाण झालेला युवक भिंगार हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असून गुरूवारी सकाळी भिंगार हायस्कुलमध्ये असताना काही विद्यार्थ्यांनी त्याला छेडले. त्याने जाब विचारला असता त्यांनी त्या युवकाला तू बाहेर ये दाखवतो, असा दम दिला.

यानंतर तो युवकाला शाळेच्या बाहेर आल्यानंतर त्याला तुझ्या मित्राने काल झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाचा फोटो स्टेटसला का ठेवला, म्हणून मारहाण केली. यावेळी या युवकाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच परत जर आमच्या समाजाच्या विरोधात मोबाईलवर काही फोटो किंवा स्टेटस ठेवले, तर तुम्हा एका एकाला जीवे मारू, अशी धमकी दिली, असे युवकाने फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com