बोकड कापण्याच्या कारणावरून 'त्यांनी' केला तरूणावर सुरीने हल्ला

राहुरीत गुन्हा दाखल || आरोपी पसार
बोकड कापण्याच्या कारणावरून 'त्यांनी' केला तरूणावर सुरीने हल्ला

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

बोकड कापण्याच्या कारणावरून चार आरोपीने संगनमत करून सलमान सय्यद या तरूणाला बोकड कापण्याची सुरी, कुर्‍हाड व लाकडी दांड्याने जबरदस्त मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दि.11 जानेवारी रोजी राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे घडली. याप्रकरणी कानडगावच्या चारजणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोकड कापण्याच्या कारणावरून 'त्यांनी' केला तरूणावर सुरीने हल्ला
देवळाली प्रवराच्या विवाहितेचा सोनईत सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

सलमान नसीर सय्यद (वय 19 वर्ष, रा. कानडगाव, ता. राहुरी) या तरूणाने दिलेल्या जबाबात म्हटले, दि. 11 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे आरोपी यांनी बोकड कापण्याच्या कारणावरून संगन मत केले आणि सलमान सय्यद याला बोकड कापण्याच्या सुरी, कुर्‍हाड व लाकडी दांड्याने जबरदस्त मारहाण केली. त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेत सलमान सय्यद हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी प्रवरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बोकड कापण्याच्या कारणावरून 'त्यांनी' केला तरूणावर सुरीने हल्ला
व्यापार्‍याची ट्रकचालक व मालकाने केली सव्वातेरा लाखांची फसवणूक

सलमान नसीर सय्यद याने लोणी पोलीस ठाण्यात दिलेला जबाब काल राहुरी पोलीस ठाण्याला प्राप्त झाला. त्या जबाबावरून आरोपी कासमभाई सत्तारभाई सय्यद, शकील कासमभाई सय्यद, हरून कासमभाई सय्यद, मोसिन कासमभाई सय्यद सर्व रा. कानडगाव या चारजणांवर राहुरी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर आरोपी हे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास राहुरी येथील पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.