किरकोळ कारणातून युवकावर कोयत्याने हल्ला

रेल्वेस्टेशनवरील घटना: श्रीगोंद्याच्या दोघांविरूध्द गुन्हा
किरकोळ कारणातून युवकावर कोयत्याने हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रेल्वेब्रीज (Railway Bridge)चढत असताना धक्का लागल्याच्या कारणातून दोघांनी एका युवकाला कोयत्याने मारहाण (Young man Beaten) केली. मंगळवारी सकाळी रेल्वेस्टेशन (Railway Station) परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात हसी बुलमंदल (रा. पश्‍चिम बंगाल, हल्ली रा. केडगाव) हा युवक जखमी (Injured) झाला आहे. त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून कोयत्याने हल्ला करणारे दोन युवकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पेश अरूण लोखंडे (वय 19), अक्षय रमेश वामन (वय 19 दोघे रा. मांडवगण ता. श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगर रेल्वे स्टेशन येथे मंगळवारी सकाळी कल्पेश व अक्षय हे दोघे रेल्वे ब्रीजवरून खाली उतरत असताना फिर्यादी ब्रीज चढत होता. यादरम्यान फिर्यादी यांचा आरोपींना धक्का लागला. या कारणातून आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्याने फिर्यादीवरून हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी हल्ला करणार्‍या दोघांना अटक केली. पुढील तपास पोलीस अंमलदार औटी करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com