आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या 34 वर्षीय आदिवासी महिलेचा

चणेगाव येथील गोकुळ राजू ढमक याने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन आश्वी पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत आश्वी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 13 नोव्हेंबर रोजी झरेकाठी शिवारातील एका शेतात 34 वर्षीय आदिवासी महिला शेळ्या चारण्यासाठी गेली होती. यावेळी पाळत ठेवून गोकुळ राजू ढमक हा महिलेजवळ आला व पैशाचे अमिष दाखवून त्याने महिलेचा हात धरुन ओढला. तसेच या महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत सदर महिलेने आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरुन आश्वी पोलिसांनी गोकुळ ढमक याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 354 (अ) (ड) व अनसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या 3(1) (11) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे करत आहे. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली आहे.