महिलेचा विनयभंग करून डोक्यात गजाने मारहाण

पुणतांब्यातील एका जणाविरुध्द गुन्हा दाखल
महिलेचा विनयभंग करून डोक्यात गजाने मारहाण

राहाता |वार्ताहर| Rahata

गावातील तरुणाने पती घरात नसताना स्वयंपाक घरात येऊन महिलेचा हात (women hand) धरला व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग (Molested) केला. तसेच डोक्यात पाठीमागील बाजूने मारहाण (Beating) केली. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात (Rahata Police station) एका जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणतांबा (Puntamba) येथे 2 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पीडित महिला स्वयंपाक करत होती. त्यादरम्यान तिचे पती औषधे आणण्यासाठी पुणतांबा (Puntamba) गावात गेले असताना त्याचवेळी दयानंद गोविंद काळे हा अचानक घरामध्ये आला. त्यावेळी त्याच्या हातात गजाचा तुकडा होता. त्याने घरात आल्यावर महिलेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व त्याच्या हातातील गजाच्या तुकड्याने महिलेच्या डोक्याचे पाठीमागील बाजूस मारहाण (beating) करून पलायन केले. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील लोक जमा झाले. पती आल्यानंतर पीडित महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी दयानंद गोविंद काळे (Dayanand Govind Kale) याच्या विरोधात भा. दं. वि. कलम 354 ,452 ,324 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. मंडलिक करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com