महिलेला मारहाण करत केला विनयभंग

महिलेला मारहाण करत केला विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उपचार घेण्यासाठी जिल्हा रूग्णालयात (District Hospital) जाणार्‍या 30 वर्षीय महिलेला मारहाण (Women Beating) करत तिचा विनयभंग करण्यात आला. मंगळवारी रात्री बोल्हेगाव (Bolhegav) परिसरात स्मशानभुमीजवळ ही घटना घडली. याप्रकरणी पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गोपी सुनील आरडे (रा. बोल्हेगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेच्या पोटात दु:खत असल्याने मंगळवारी रात्री त्या उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात जात असताना बोल्हेगाव स्मशानभुमीजवळ गोपी आरडे याने त्यांना अडविले. फिर्यादी महिलेला गोपी याने तोंड दाबून मारहाण केली. त्यांच्याशी गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिडीत महिलेने रात्रीच तोफखाना पोलीस ठाणे (Topkhana Police Station) गाठून आरडे विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी विनयभंग, मारहाण, शिवीगाळ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक एच. एम. आव्हाड करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com